घरमहाराष्ट्रSanjay Raut : "भाजपाला 400 जागा जिंकण्याची खात्री मग...", संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल

Sanjay Raut : “भाजपाला 400 जागा जिंकण्याची खात्री मग…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल

Subscribe

रामालाही विसरले, आणि परत काँग्रेसच्या भजनाला लागले आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.

नवी दिल्ली : भाजपा 400 जागा जिंकण्याचा खात्री आहे मग वारंवार काँग्रेसवर टीका का करते? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावरून केला आहे. भाजपा आणि पंतप्रधान मोदींना काँग्रेसची भीती वाटते, असा टोला लगावून, भाजपाही इतिहासाची मोडतोड करून सांगते, असा आरोपाही संजय राऊत यांनी केला आहे.

पंतप्रधान मोदी हे काँग्रेस आणि पंडित नेहरूंवर टीका करत आहे, याबाबत संजय राऊत म्हणाले, “आजही भाजपाला काँग्रेसची भीती वाटते. आजही भाजपाला काँग्रसेचे आव्हान आहे. काँग्रेस आणि इंडियाची भीती असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तुम्हाला तुमच्या हिमतीवर आणि ताकदीवर 400 जागा मिळणार आहेत ना मग गेल्या दहा वर्षांत तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करत आहात? 50-60 वर्षांचा इतिहास मोडूनतोडून सांगात आहेत. तुम्ही तुमच्या विकास कार्याविषय बोला”, असे आव्हान संजय राऊतांनी भाजपाला दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : सर्व्हे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता मोदींसोबत जाण्याची – देवेंद्र फडणवीस

भाजपाला रामाला विसरले, पुन्हा काँग्रेसच्या भजनाला लागेल

संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या भाषणात कुठेही मणिपूरचा उल्लेख आला नाही. तुम्ही काँग्रेसमुळे राष्ट्र कसे दुभंगले हे सांगितले, पण मणिपूर दुभंगले आहे. मणिपूर विषय तुमच्या मनात थोडीही वेदना नसावी! काश्मिरी पंडितांविषयी एक शब्दही बोलले नाहीत. या सर्व मुद्यावर भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस विषयी भजन करत बसललात. आता हे रामालाही विसरले आणि परत काँग्रेसच्या भजनाला लागले आहे.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -