घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSanjay Raut : भाजपाचे नेतृत्व ही भुताटकी, पंतप्रधानांबद्दल बोलताना राऊतांची जीभ घसरली

Sanjay Raut : भाजपाचे नेतृत्व ही भुताटकी, पंतप्रधानांबद्दल बोलताना राऊतांची जीभ घसरली

Subscribe

छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राऊतांनी आता पंतप्रधानांची तुलना थेट गब्बर सिंगशी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कायमच टीका करत असतात. याआधी त्यांनी पंतप्रधानांची तुलना औरंगजेबाशी केली होती. ज्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण शांत होते ना होते, तेच आता राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना जीभ घसरली आहे. त्यांनी मोदींची तुलना थेट गब्बर सिंगशी केली आहे, ज्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Sanjay Raut called PM Narendra Modi gabber)

खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे. मात्र तो चेहरा आहे की मुखवटा हे येणारा काळ ठरवेल. हा चेहरा अत्यंत भयावह आहे. लोक घाबरत आहेत त्या चेहऱ्याला. भूत आले म्हणतात. लोकांना हा चेहरा नको आहे, असा टोला राऊतांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा…, राऊतांची पंतप्रधान मोदींच्या विधानावर सडकून टीका

तर, गब्बर नंतर कुठल्या चेहऱ्याला लोक घाबरत असतील तर तो मोदींचा चेहरा आहे. शोलेमध्ये एक डायलॉग होता बच्चा सो जा नहीं तो गब्बर आ जायेगा, त्याप्रमाणेच यांच्याबद्दल लोकांना वाटतं आहे. कधीही टीव्हीवर येतील, काहीही घोषणा करतील. हा चेहरा लोकांना नको आहे. फडणवीसांना काहीही बोलू द्या. पण भाजपाचे नेतृत्व ही भुताटकी आहे, अशी टीका करत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना चित्रपटातील सर्वाधिक निगेटिव्ह पात्र ठरलेल्या गब्बर सिंगशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी एक नंबरचे खोटारडे…

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबरचे खोटारडे म्हटले आहे. “एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान आपल्या देशाला लागला आहे. खोटे बोलण्याची स्पर्धा ऑलिंपिकमध्ये लागली तर नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल. आपले सरकार आले तर ही स्पर्धा आपण आयोजित करु आणि मोदींना पाठवू म्हणजे खोटे बोलण्यातले गोल्ड मेडल ते आणतील. मोदींइतके जलदगतीने खोटे बोलणारा माणूस मी पाहिलेला नाही,” अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : राजकारण आम्हालाही कळते…, राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -