Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नारायण राणेंच्या इशाऱ्याला राऊतांचे आव्हान, "हिंमत असेल तर कोकणात थांबवून दाखवा"

नारायण राणेंच्या इशाऱ्याला राऊतांचे आव्हान, “हिंमत असेल तर कोकणात थांबवून दाखवा”

Subscribe

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात असलेल्या बारसू या गावात रिफायनरी प्रकल्प करण्यात येऊ नये, यावरून वातावरण तापले आहे. या विरोधात बारसू गावातील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येत आहे. सध्या हे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात असलेल्या बारसू या गावात रिफायनरी प्रकल्प (Barsu refinery project) करण्यात येऊ नये, यावरून वातावरण तापले आहे. या विरोधात बारसू गावातील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येत आहे. सध्या हे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे. पण यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) बारसू ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी 6 मे ला बारसूमध्ये जाणार आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्या कोकणात जाण्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडून आव्हान देण्यात आले होते. त्यांच्या या आव्हानाला आता आता संजय राऊत यांनी प्रतिआव्हान देण्यात आले आहे.

हेही वाचा – “आता गद्दार मिशा काढणार का?” संजय राऊत यांची संतोष बांगर यांच्यावर टीका

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी बारसू गावात जाण्याची घोषणा केली. यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हंटले होते की, “कोकणात येण्याची तारीख जाहीर करावी. आम्ही पण येतो, तिकडे बघूया… होऊन जाऊदे एकदाचं… कोकणातून मुंबईत पळून जाण्यासाठी किती किलोमीटर लागेल… चालण्याची ताकद नसणाऱ्यांनी पळण्याचा विचार सुद्धा करू नये. उद्धव ठाकरेने कोकणात येऊन दाखवाव,” असे आव्हान राणेंनी केले होते.

संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे हे 6 मे ला कोकणात जाणार आहेत. सकाळी बारसूला पोहोचतील. रिफायनरीच्या संदर्भात जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलकांना, ग्रामस्थांना आणि भूमिपूत्रांना भेटतील. तसेच, त्यांच्यासोबत चर्चा करतील. त्यांच्यासोबत घडलेल्या अन्यायाची, अत्याचाराची माहिती घेतील. त्यानंतर ते महाडला होणाऱ्या सभेसाठी रवाना होतील, अशी माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली.

- Advertisement -

काही लोक बोलतात कोकणात येऊ देणार नाही पण आम्ही कार्यक्रम जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे हे बारसूतही जातील आणि महाडमध्ये पण जातील. त्यामुळे हिंमत असेल कोकणात थांबून दाखवा, असे प्रतिआव्हान संजय राऊत यांच्याकडून नारायण राणे यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे कोकणात गेल्यानंतर नेमके काय होणार हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -