Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेउद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावरून संजय राऊतांचे ठाणे पोलीस आयुक्तांना आव्हान, म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावरून संजय राऊतांचे ठाणे पोलीस आयुक्तांना आव्हान, म्हणाले…

Subscribe

कालपासूनच (ता. 10 नोव्हेंबर) पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. तर पदाधिकाऱ्यांना तडीपार करण्याच्या धमक्या या पोलिसांकडू देण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

ठाणे : 2 नोव्हेंबरला ठाण्यातील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात असलेली 22 वर्षे जुनी शाखा पाडण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर चालवून ती शाखा पाडण्यात आली. ज्यामुळे आता आज (ता. 11 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाच्या काही नेत्यांसह या पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला भेट देणार आहेत. परंतु, त्याआधीच मुंब्य्रातील राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. परंतु, कालपासूनच (ता. 10 नोव्हेंबर) पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. तर पदाधिकाऱ्यांना तडीपार करण्याच्या धमक्या या पोलिसांकडू देण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. ज्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून राऊतांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांनाच आव्हान दिले आहे. (Sanjay Raut challenges Thane Police Commissioner over Uddhav Thackeray’s Mumbra visit)

हेही वाचा – मुंब्य्रातील वाद आणखी चिघळणार? पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला उद्धव ठाकरे देणार भेट

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सगळे ठाकरे गटाचे पदाधिकारी हे मुंब्य्राला जाणार आहोत. त्यामुळे तिथे जाऊन फक्त समाचारच नाही घेणार तर छातीवर पाय रोवून उभे राहणार आहोत. असंख्य शिवसैनिक यावेळी असतील. पैसा, सत्ता, दहशत याच्या बळावर ज्या शाखेवर बुलडोझर फिरविण्यात आला. जे स्वतःला शिवसैनिक मानतात पण ते अफझल खानाची औलाद आहेत. असे प्रकार हे मोघलाईत घडत होते. कारण त्यावेळी मंदिरे पाडण्यात आली, लोकांच्या घरादारावर नांगर फिरवण्यात आली. ती मोघलाई होती आणि आता देखील तेच सुरू आहे. याचा कोणत्याही जाती-धर्माशी संबंध येत नाही, अशी टीका करत राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले.

ज्याला आम्ही मंदिर मानतो, ज्यात बाळासाहेब ठाकरेंची पूजा होत होती. दिघेंचा फोटो होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. त्याच्यावर बुलडोझर फिरवून शिंदे गटाने आपला डीएनए काय आहे, हे स्पष्ट केले, असा टोला लगावत संजय राऊत म्हणाले की, असंख्य शिवसैनकांच्या मागणीनंतर आज उद्धव ठाकरे मुंब्य्राला जात आहेत. पण उद्धव ठाकरेंना मुंब्य्रात जाण्यापासून रोखण्याचे कारस्थान पोलिसांनी रचलेले आहे. कालपासून पोलिसांनी मुंब्रा आणि ठाणे परिसरात दहशत निर्माण केली आहे. ठाणे ग्रामीण, मुंब्रा, कळवा, ठाणे परिसरातील शिवसैनिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना तडीपार करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप राऊतांकडून ठाणे पोलिसांवर करण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच, पहाटे पोलिसांसमोर उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडण्यात आले. त्यामुळे उद्धव यांना अडवण्याची पोलिसांची भूमिका आहे. म्हणून आम्ही सांगतो की, पोलिसांनी त्यांना जरूर अडवावे. तुम्हाला महाराष्ट्रातील दिवाळीत मीठाचा खडा टाकायचा असेल तर तुम्ही जरूर आडवा. आज उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना अडवण्यासाठी जे पोलीस हजारोच्या फौजफाट्याने कामाला लागले आहेत ते शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर चालताना कुठे होते?, पोलीस कोणाची गुलामगिरी करत आहेत?, प्रशासन कोणाची गुलामगिरी करत आहे? असा प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्यात आला.

आज ज्यांची तुम्ही चाकरी करत आहात, तो मालक 31 डिसेंबरनंतर महाराष्ट्रात राहणार नाही. 2024 नंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात बदल होणार आहे. त्यामुळे जेव्हा आज तुम्ही चाकरी करत शिवसैनिकांवर हात उगारत आहात. त्यांना नोटीसा पाठवत आहात त्यांनी स्वतःचे काय होणार याचा विचार करावा. मग ते पोलीस अधिकारी असतील, प्रशासनातील लोक असतील, गुंड आणि माफिया असतील, आम्ही त्याची परवा करत नाही. तोडीस तोड उत्तर दिले जाईल. अंगावर यायची इच्छा असेल तर आम्ही तयार आहोत. त्यामुळे आज संध्याकाळी 4 वाजता आनंद नगर नाक्यावर आम्ही पोहोचणार आहोत, त्यानंतर आम्ही मुंब्य्राला जाणार आहोत, हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे थेट आव्हान संजय राऊत यांच्याकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाण्यातील राजकीय वातावरण हे चांगलेच तापले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -