Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Shivsena UBT : 2019 लोकसभेत जिंकलेल्या जागा लढवणारच, संजय राऊतांचा दावा

Shivsena UBT : 2019 लोकसभेत जिंकलेल्या जागा लढवणारच, संजय राऊतांचा दावा

Subscribe

मविआमध्ये जागांविषयी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसून 2019 मध्ये लोकसभेच्या ज्या जागा आम्ही जिंकल्या होत्या, त्या आम्ही लढवणारच, असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभेच्या अनुषंगाने 16-16-16 असा फॉर्म्युला ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. पण या चर्चांना आता ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी पूर्णविराम लावला आहे. मविआमध्ये जागांविषयी असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसून 2019 मध्ये लोकसभेच्या ज्या जागा आम्ही जिंकल्या होत्या, त्या आम्ही लढवणारच, असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. संजय राऊत हे सध्या नांदेडच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Sanjay Raut claims that he will contest the seats won in 2019 Lok Sabha )

हेही वाचा – निवडणुका घ्या मग कळेल पोपट कुणाचा मेलाय, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

- Advertisement -

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पवार साहेबांच्या नेतृत्वात बैठक आम्ही घेतली आणि 16-16 चा फॉर्म्युला ठरला ही बातमी तुम्ही आम्हाला देताय. जे आम्हाला माहीत नाही. बैठकीत जे काही ठरलंय, त्याबाबतची बाहेर आलेली माहिती ही चुकीची आहे. तुम्हाला कोण ही माहिती देतं आणि तुम्ही त्यानुसार त्या बातम्या देता, हे मला माहीत नाही. पण असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असेही राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले.

लोकसभा जागा वाटपासंदर्भात आता प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात कोणी बैठका घ्याव्यात, कोणत्या विषयाला धरून घ्याव्यात, याबाबतची चर्चा बैठकीत झाली असल्याची माहिती राऊतांनी दिली. पण आकड्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पण पत्रकार नवीन आकडा देत आहेत, त्याचे स्वागत आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी आहे आणि राहिल…
महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि राहिल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या वज्रमुठीनेच लढवल्या जातील. याबाबत या बेकायदेशीर सरकारने काहीही म्हणू दे. आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि होणारही नाहीत. एकत्र राहूनच सध्याच्या घटनाबाह्य सरकारला घालवू, असे राऊतांकडून यावेळी सांगण्यात आले.

तसेच, 2019 मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या 18 जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल अन् पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व 19 जण निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर जिंकलेल्या जागा या त्यांच्याकडेच राहतात, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

- Advertisment -