घरमहाराष्ट्रSanjay Raut : प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्ट मत, म्हणाले...

Sanjay Raut : प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्ट मत, म्हणाले…

Subscribe

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये वंचितला अधिकृत स्थान द्या, अशी मागणी काल (ता. 30 जानेवारी) वंचितचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. मविआच्या बैठकीत झालेल्या नाराजी नाट्यानंतर काहीच वेळात मविआने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहित वंचितला मविआत अधिकृत स्थान दिले. पण या पत्रानंतर वंचितकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. ज्यानंतर आज (ता. 31 जानेवारी) प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. वंचित अजूनही मविआमध्ये सहभागी नसल्याचे आंबेडकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, आंबेडकरांच्या या भूमिकेबाबत ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. (Sanjay Raut clear opinion on Prakash Ambedkar’s statement)

हेही वाचा… Varsha Gaikwad on CM Shinde : “विरोधकांना निधी मिळत नाही”, वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

- Advertisement -

एआयसीसीकडून वंचितला अद्यापही अधिकृत पत्र देण्यात आलेले नाही, ज्यामुळे आघाडीत त्यांचा समावेश आहे, असे ते सध्या तरी समजत नाही, असा प्रश्न प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांच्यासमोर उपस्थित केला असता यांवर उत्तर देताना ते म्हणाले की, 2 तारखेच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी कळवले आहे. महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी आहे, त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या प्रमुख नेत्यांना आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमख उद्धव ठाकरे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आहेत. या सगळ्यांनी त्यांना अधिकृतपणे त्यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेतले आहे. त्या संदर्भातील रितसर पत्र आम्ही त्यांना दिले आहे. त्यानंतर आमची आणि त्यांची चर्चा झाली. 2 तारखेला एकत्र बैठकीला बसणार आहोत.

तर, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या राज्याचे असल्याने ते निर्णय त्यांच्या राज्यापुरते घेऊ शकतात. पण त्याच बैठकीत निर्णय झाला असे म्हणून काँग्रेसने याबाबत स्पष्टीकरण द्यावे. तसेच, कालच्या बैठकीत वंचितला अपमानास्पद वागणूक मिळालेली असली तरी मविआच्या 2 फेब्रुवारीच्या बैठकीत वंचित सहभागी होणार आहे. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्हाला तिथे कशी वागणूक मिळाली याचा आम्ही फार बोभाटा करणार नाही. कारण आमचे आधीपासून एकच म्हणणे आहे की आपल्याला देशातून भाजपाचे धोकादायक सरकार उलथून टाकायचे आहे. भाजपाला विरोध म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. अशा परिस्थितीत आम्ही किंवा इतर कोणीही वैयक्तिक हेवेदावे चर्चेत आणू नये. ‘मी’पणा आणि भाजपा-आरएसएसचे सरकार उलथून टाकणे यापैकी एका गोष्टीला प्राथमिकता द्यायची असेल तर आम्ही भाजपा-आरएसएसचे सरकार उलथून टाकण्याला अधिक महत्त्व देऊ, असेही आंबेडकरांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -