घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरे अयोध्येला जाणार, कारण... - संजय राऊत

उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार, कारण… – संजय राऊत

Subscribe

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला राम जन्मभूमीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यापासूनच राम मंदिराच्या उभारणीची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजनाला येणार आहेत. मात्र, त्यासोबतच या कार्यक्रमाला देशभरातून अजून कोण येणार? याची देखील उत्सुकता आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधी आणि नंतरही अयोध्या दौऱ्यावर जाऊन आले आहेत. मात्र, आता ते जाणार का? अशी चर्चा सुरू आहे. कारण आमंत्रितांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे किंवा नाही, याबाबत निश्चित अशी माहिती जाहीर झालेली नाही. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र एबीपीशी बोलताना उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरेंना आमंत्रणाची गरज नाही

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रितांमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर ‘अयोध्येला (Ayoddhya) जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रणाची गरज नाही’, असं राऊत म्हणाले होते. आता त्यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्री अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलं आहे. ‘शिवसेनेचं अयोध्येशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं आहे. आजच्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यातले अडथळे दूर करण्यात शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे. मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अयोध्येला गेले होते. त्यामुळे ते आताही अयोध्येला जाणार’, असं राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी जाणं टाळावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी केली आहे. ट्वीट करून त्यांनी ही मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -