घरमहाराष्ट्रSanjay Raut : "शिवसेना फुटीच्या वेळीच कॉंग्रेसही फुटणार होती", संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut : “शिवसेना फुटीच्या वेळीच कॉंग्रेसही फुटणार होती”, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Subscribe

नांदेड हा कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. नांदेडमध्ये काँग्रेसचा उमदेवार लढेल आणि जिंकेल, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जेव्हा एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले, तेव्हा अशोक चव्हाण देखील काँग्रेस सोडून जाणार होते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच नांदेड हा कोणाचा बाल्लेकिला नाही, तिथे काँग्रेस जिंकणार आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर संजय राऊत म्हणाले, “अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच अशोक चव्हाण यांची काँग्रेस सोडण्याची योजना होती. हे मराठवाड्यातील पत्रकारांना हे माहिती असेलच. अशोक चव्हाण हे आता नाही तर, गेल्या काही काळापासून काँग्रेस सोडण्यासाठी धडपडत होते. आता अशोक चव्हाण यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.” यापूर्वीच अशोक चव्हाण यांनी दोन वेळा लोकसभेची निवडणूल लढवली आणि ते पडले. त्यामुळे नांदेड हा कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. नांदेडमध्ये काँग्रेसचा उमदेवार लढेल आणि जिंकेल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेईल – विजय वडेट्टीवार

चोऱ्यामाऱ्या करणे ही काय रणनिती आहे का?

इंडियातून नितीश कुमार आणि महाविकास आघाडीतून अशोक चव्हाण बाहेर पडले. यामुळे भाजपा आपली माणसे पेरून रणनिती ठरवते का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “चोऱ्यामाऱ्या करणे ही काय रणनिती आहे का? भ्रष्टाचाराच्या सत्कार करणे, गुन्हेगार, दरोडेखोर आणि बलात्काऱ्यांना पक्षात घेणे ही काय रणनिती आहे का? याला रणनिती म्हणत असाल तर, हा चाणक्याचा अपमान आहे”,

- Advertisement -

हेही वाचा – Modi Govt : वानखेडे आणि शिंदेंबाबत कायद्याचे दुहेरी मापदंड का? ठाकरे गटाचा थेट सवाल

अशोक चव्हाणांचा भाजपामध्ये जाण्याचा निर्णय चुकीचा

अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशोक चव्हाण हे हुशार राजकारणी आणि चांगले प्रशासक आहे, हे मान्य केलेच पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मकबाबतीत अशोक चव्हाण यांच्या अभ्यास आणि पकड आहे, हे सर्व आम्हाला मान्य आहे. पण भाजपामध्ये जाण्याचा अशोक चव्हाणांचा निर्णय हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून स्वत: अशोक चव्हाण यांच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे, अशी भविष्यावाणी संजय राऊत यांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -