घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री आपला मुक्काम दिल्लीत हलवतील असं वाटतंय, संजय राऊतांचा खोचक टोला

मुख्यमंत्री आपला मुक्काम दिल्लीत हलवतील असं वाटतंय, संजय राऊतांचा खोचक टोला

Subscribe

मुख्यमंत्र्यांना एका महिन्यात पाचवेळा दिल्लीत यावं लागतंय, आपला मुक्काम दिल्लीत हलवतील की काय असं राज्याच्या जनतेला वाटू लागलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या महिन्याभरात पाचवेळा दिल्लीला गेले आहेत. आज पुन्हा सहाव्यांदा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना एका महिन्यात पाचवेळा दिल्लीत यावं लागतंय, आपला मुक्काम दिल्लीत हलवतील की काय असं राज्याच्या जनतेला वाटू लागलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – कनाथ शिंदेंची आणखी एक ऑडियो क्लिप व्हायरल, बुलडाण्यातील शेतकऱ्याला दिलं आश्वासन

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या मनात खूप गोंधळ आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत यावं लागलं नाही. शिवसेनेचे हायकमांड कायम मुंबईतच राहिले. मुंबईतच चर्चा झाली. दिल्लीचे लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. अमित शहांनी मातोश्रीवर येऊन चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांना एका महिन्यात पाचवेळा दिल्लीत यावं लागतंय, आपला मुक्काम दिल्लीत हलवतील की काय असं राज्याच्या जनतेला वाटू लागलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

सध्या महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. पूरपरिस्थितीमुळे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप झाली नाही. एक महिना झाला तरी दोघांचं कॅबिनेट बेकायदेशीररित्या निर्णय घेत आहे. महाराष्ट्राला काय मिळतंय आणि त्यांच्या गटाला काय मिळतंय हे त्यांनाच माहितेय, असंही ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सुनावणी 5 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली

या गटाने शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवलं याचं आत्मचिंतन करण्याची गरज. सर्वोच्च न्यायालय संविधान आणि कायद्याविरोधात जाऊन निकाल देणार नाही याची खात्र असल्याने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील. त्यांना स्वतःचा बचाव करण्याकरता दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागले, मग ते स्वतःला शिवसैनिक कसे म्हणवून घेणार? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

दुसऱ्या पक्षात विलिन होण्याकरता किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची कल्पना आहे. हे आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. एखादा गट दुसऱ्य पक्षाची युती करत असेल तर त्यावर बोलायची गरज नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती, शिवसेना फोडून पालिकेसह अनेक निवडणुका जिंकायच्या होत्या. भाजपला महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दुबळं करायचं आहे, असाही घणाघात त्यांनी केला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -