घरमहाराष्ट्रSanjay Raut : मुख्यमंत्र्यांची दाढी दिल्लीच्या हातात, राऊतांचा शिंदेंसोबत भाजपावरही निशाणा

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांची दाढी दिल्लीच्या हातात, राऊतांचा शिंदेंसोबत भाजपावरही निशाणा

Subscribe

मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिलेल्या प्रत्युत्तराचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांची दाढी ही दिल्लीच्या हातात आहे, त्यामुळे दिल्लीतले ती दाढी कधीही खेचून त्यांना बोलवतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत ‘मिंध्यांच्या दाढीला पकडून कुठूनही खेचून आणले असते’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिलेल्या प्रत्युत्तराचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांची दाढी ही दिल्लीच्या हातात आहे, त्यामुळे दिल्लीतले ती दाढी कधीही खेचून त्यांना बोलवतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे. ज्यामुळे आता आणखी एका मुद्द्यावरून दोन्ही गटात वाद रंगला असल्याचे पाहायला मिळत आहे. (Sanjay Raut criticism CM Eknath Shinde and BJP)

हेही वाचा… Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये; असा असणार दौरा

- Advertisement -

आज (ता. 12 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, देशातील इतर धर्मियांच्या लोकांना घाबरवले जात आहे. हिंदूंमध्ये फूट पाडली जात आहे. त्यामुळे मुस्लिम नेते, कार्यकर्ते आम्हाला येऊन सांगत आहेत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमचे हिंदुत्व हे घरात चूल पेटवणारे हिंदुत्व आहे, भाजपाचे हिंदुत्व हे घर जाळणारे हिंदुत्व आहे. देशात जाती-धर्माच्या आधारावर नाही, तर रामासोबत कामही मिळाल पाहिजे. रोजगाराची चूल पेटली पाहिजे. आम्ही या देशाचा पाकिस्तान-इराण होऊ देणार नाही, असे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

तर, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रविवारी (ता. 11 फेब्रुवारी) सभेत म्हणाले की, ‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’. त्यांच्या या टीकेवर संजय राऊतांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना रामायण वाचावे लागेल. यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाले आहेत. साहित्य, कला, काव्य यामध्ये ते मुख्यमंत्री रमत होते. कोणाचे काय जळत आहे हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीची लंका जळतेय. तुम्ही जिथे गेला आहात, त्यांचीच लंका जळणार, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला.

- Advertisement -

विचार चोरुन मिळत नसतात. सध्या चोरटे, भामटे यांचे राज्य आहे. डायलॉगबाजी आम्हाल सांगू नका. आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालो आहोत. त्यामुळे आम्हाला डायलॉग येतात. तुमची दाढी दिल्लीच्या हातात आहे. दिल्लीला वाटेल तेव्हा दाढी खेचून तुम्हाला दिल्लीला बोलावले जाते. रावणाची लंका होती. महाराष्ट्रात पंचवटीमध्ये रामाचे वास्तव्य होते. तुमच्या दाढीला आम्हीच आग लावणार, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईलच, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -