घरमहाराष्ट्रSanjay Raut : "बंदूक दाखवून सोबत घेतले ते मित्र नाहीत" सत्ताधाऱ्यांवर राऊतांचा...

Sanjay Raut : “बंदूक दाखवून सोबत घेतले ते मित्र नाहीत” सत्ताधाऱ्यांवर राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

नवी दिल्ली : भाजपासोबत असलेले काही मित्र पक्ष नाही. दशतीने, डोक्याला बंदूका लावून भाजपाने काही लोकांना सत्ता स्थापन करण्यासाठी सोबत घेतले आहे, असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी टीका केली. भाजपाकडून ज्यांना सोबत घेण्यात येत आहे, ते मित्र पक्ष नाही तर हे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सोबत आहेत, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut criticism of allies in the ruling coalition)

हेही वाचा… Sanjay Raut : “महाराष्ट्राला मिळालेले गृहमंत्री कमजोर आणि…”, फडणवीसांना राऊतांचा टोला

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, ईडीचा धाक दाखवून जे लोकांना आपल्यासोबत घेत आहेत, त्यांना केवळ निवडणुका जिंकण्याासाठी सोबत घेण्यात येत आहेत. त्यांना तुम्ही मित्रपक्ष कसे बोलता येऊ शकते? असा प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्याीत आला. तर शिवसेना भाजपाचा मित्र पक्ष होता, असेही राऊतांकडून सांगण्यात आले. बाकी सुद्धा जे काही सुरू आहे, ते केवळ ईडीच्या प्रभावाने करण्यात येत आहे. मुंबईतही काल शिवसेना ठाकरे गटाविरोधात असाच प्रयोग करण्यात आल्याचे म्हणत त्यांनी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीबाबत भाष्य केले.

आगामी निवडणुकीत भाजपा-मनसे युती होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे मनसे-भाजपा युती झाली तरी ते मित्र पक्ष बनणार नाही, तो केवळ एक व्यवहार असेल, असेही राऊतांकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि त्या पक्षातील नेत्यांच्या भूमिका या नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचेच त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे, ज्यामुळे महाराष्ट्रवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीसोबत राज ठाकरे यांच्यासारखा स्वाभीमानी माणूस युती करेल, असे वाटत नाही, असे संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

तर, चंदीगडमधील महापौरपदाच्या निवडणुकीत जो प्रकार झाला तो सर्वोच्च न्यायालयाने आता तरी रोखला आहे. परंतु, इतरही ठिकाणी असे होऊ शकते. या देशात ईव्हीएमविरोधात फार मोठे आंदोलन सुरू आहे. मात्र कोणतीही माध्यमे त्याला महत्त्व देत नाहीत. आपल्या देशात काळ्या पैशाचा वापर करून आमदार, खासदार, नगरसेवक खरेदी केले जात आहेत. परंतु, माध्यमांना त्याचे गांभीर्य नाही, असेही राऊतांकडून सांगण्यात आले.

भारतात सक्तवसुली संचालनालयासह (ईडी) इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा (सीबीआय, आयटी) वापर करून विरोधी पक्ष फोडले जात आहेत, नेते फोडले जात आहेत. त्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात घेतले जात आहे. ही लोकशाहीसाठी सूचिन्हं नाहीत. महाराष्ट्र असेल किंवा अन्य राज्ये असतील, प्रत्येक ठिकाणी ईडीचा गैरवापर होत आहे. प्रखर बोलणाऱ्यांविरोधात, आंदोलने करणाऱ्या पक्षांविरोधात ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आव्हान उभे केले जात आहे. परंतु, शिवसेना असेल, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव, शरद पवार यांच्यासह आम्ही सर्वजण आजही देशातल्या हुकूमशाहीविरोधात लढायला उभे आहोत. आम्ही लढू आणि जिंकू, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -