घरताज्या घडामोडीSanjay Raut : भोंगे लावून केलेली कामं सांगणार, राज ठाकरे आणि भाजपला...

Sanjay Raut : भोंगे लावून केलेली कामं सांगणार, राज ठाकरे आणि भाजपला राऊतांचा टोला

Subscribe

रस्ते, पाणी हे शिवसेनेचे (ShivSena) नगरसेवक करतात. फक्त राजकारण आम्ही करत नाही. फक्त भोंगे लावून आपण हे सांगत नाही. यापुढे आपणही महानगरपालिकेवर भोंगे लावू. तसेच आम्ही काय कामं केली आहेत. ते आम्ही लोकांना भोंग्यांच्या माध्यमातून सांगू. पाच वर्ष निवडून दिल्यानंतर तुम्ही या शहरासाठी (City) आणि लोकांसाठी काय केलंत?, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपला (Bjp) टोला लगावला आहे.

पुणे महापालिकेवर भगवा झेंडा फडकावण्याची जिद्द आपण ठेवली पाहीजे

पुण्यामध्ये शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान आहे. या माध्यमातून संजय राऊतांनी पुण्यातील लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. काही होईल कुणामध्ये महाविकास आघाडीचं काय होईल. हे आपण दाखवू शकतो. पण जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीशी सामना करून आपण या पुणे महापालिकेवर भगवा झेंडा फडकावण्याची जिद्द आपण ठेवली पाहीजे. मागील वेळेचे आकडे पाहिले असता या भागातून आपल्यालाच जास्त जागा मिळाल्या आहेत. अजून जागा मिळतील कारण आपण पुणे जिल्ह्यात आपण जास्त झंझावत निर्माण केला होता. शिवसंपर्क पुण्यात झालं असून आपण खूप मोठा मेळावा घेतला. त्यामुळे पुण्यात एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे.

- Advertisement -

लढणाऱ्या शिवसैनिकांना त्या जागा मिळणार

जगभरात आज तुम्ही कुठेही गेलात तरी लढणाऱ्यांना प्रेरणा द्यायचं काम दोन लोकांनी केलं. पहिले म्हणजे या देशाचे महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. गौतम बुद्धांचा एकच संदेश आपण अहंकार सोडून लक्षात ठेवला पाहीजे. ज्याने अहंकार सोडला तो विजयी झाला. आजही काही लोकांच्या मनामध्ये अहंकार आहे. हा अहंकार जर दूर केला तर समाजामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये सर्व गोष्टी सुरळीत होतात. मगाशी आपण उल्लेख की, ४२ जागांचं काय होणार?, ४२ जागा आहेत की चांगली गोष्ट आहे. परंतु लढणाऱ्या शिवसैनिकांना त्या जागा मिळणार आहे, असं राऊत म्हणाले.

पुणे शहराला एक दिशा देण्याचं काम केलं पाहीजे

महिला आघाडी आणि तरूण मुलं मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. जुन्या, नव्या आणि तरूण शिवसैनिकांना आपण एकत्र केलं पाहीजे. आपल्याला पुणे शहराला एक दिशा देण्याचं काम केलं पाहीजे. शिवसेनेचा नगरसेवक काय करू शकतो. आपले मोजके नगरसेवक आहेत. प्रत्येकाचं काम हे आदर्श काम आहे. नगरसेवक म्हणून काय काम कराल, ही जी बाळा साहेबांची संकल्पना होती. हे आपले नगरसेवक पुण्यात चांगल्याप्रकारे करण्याचं काम करत आहेत, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

कोविडच्या काळात उत्तम कामं शिवसेनेने केली आहेत. आमच्या शाखा प्रमुखांपासून ते नगरसेवकांपर्यंत सगळ्यांनी काम केलंय. त्याचे शहर प्रमुख आणि जिल्हाप्रमुख प्रत्येकाने कामं केली आहेत. ही आपली परंपरा आहे. जेव्हा आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने नुसती वास्तू भारत नाही. तर या देशामध्ये आणि समाजामध्ये लोकांना आमचा आधार हवा, त्यासाठी आम्ही काम करतो, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरात टाहो मोर्चा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -