Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : महायुतीचा मुख्यमंत्री गुजरात लॉबी ठरवेल, राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut : महायुतीचा मुख्यमंत्री गुजरात लॉबी ठरवेल, राऊतांचा खोचक टोला

Subscribe

राज्यात मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीकडून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पण महायुतीने त्यांचा शपथविधी महाराष्ट्रात न करता तो गुजरातला करावा, असा जहरी टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

मुंबई : राज्यात महायुतीला आपली सत्ता कायम ठेवण्यात मोठे यश मिळाले आहे. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवत क्लीन स्विप तर मिळवला आहे, पण त्याचसोबत राज्यातील विरोधकांचा सुपडासाफ केला आहे. पण महायुतीच्या या विजयावर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आहे. तर दुसरीकडे मात्र, महायुतीकडून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पण महायुतीने त्यांचा शपथविधी महाराष्ट्रात न करता तो गुजरातला करावा, असा जहरी टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. रविवारी (ता. 24 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील शपथविधी सोहळ्याविषयी भाष्य केले आहे. (Sanjay Raut Criticism of saying that Chief Minister of Mahayuti will decide Gujarat lobby)

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवणार आहे. महाराष्ट्रात शपथ घेण्याऐवजी त्यांनी गुजरातमध्ये शपथ सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. गुजरातला नरेंद्र मोदी स्टेडियम आहे तिथे हा शपथविधी घेतला तर अधिक संयुक्तिक ठरेल. कारण ते स्टेडियम मोठे असून तिथे अनेक लोक बसू शकतात. पण शिवतीर्थावर हा शपथविधी झाला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल. वानखेडेवर घेतला तर तो 106 हुतात्म्यांचा अपमान ठरेल. त्यामुळे हा शपथविधी गुजरातमध्ये व्हावा, हे सरकार गुजरात लॉबीला हवे होते म्हणून ते आता आणण्यात आणि लादण्यात आले आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : मविआच्या पराभवाचे कारण काय? राऊतांनी स्पष्टच सांगितले…

आम्ही निराश नाही…

तसेच, खासदार संजय राऊत म्हणाले की, जनतेच्या न्यायालयातला न्यायही विकत घेण्यात आला आहे. आम्ही निराश नाही, आम्हाला वाईट जरूर वाटले. महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय याबाबतची आम्हाला चिंता आहे. आम्ही ही लढाई अर्धवट सोडणार नाही. पण आता मतविभागणी हा सर्वात मोठा फॅक्टर ठरला आहे. त्यात मनसे, वंचित या सगळ्यांना व्यवस्थित मॅनेज करून ठिकठिकाणी आमचे उमेदवार कसे पाडण्यात आले हे चित्र मुंबईत तुम्ही बघू शकता. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी असा काय तीर मारला की त्यांना एवढ्या जागा मिळाव्यात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन विषारी प्रचार केला आणि लोकांची मनं आणि मतं भडकावली. त्याचा परिणाम झाल्याचा दिसत आहे. याचे विश्लेषण आमच्याकडून अजून सुरू आहे, असेही यावेळी राऊतांनी सांगितले.

- Advertisement -

तर, शरद पवारांसारखा नेता यांनी गद्दारांविरोधात भूमिका घेतली. त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता, जेणेकरून शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे तिथे जर शरद पवारांचा उमेदवार पडले असते तर ही गोष्ट गंभीर असल्याचे आम्हालाही वाटले असते. शिवसेनेच्या अनेक बालेकिल्ल्यात आम्हाला हार पत्करावी लागली ही बाब सुद्धा गंभीर आहे. एकनाथ शिंदे हे फार मोठा विचार घेऊन राजकारणात आलेले नाहीत. ते शिवसेनेशी बेईमानी करून भारतीय जनता पक्ष मोदी-शहांच्या मदतीने आपले राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपा हा वापरा आणि फेका या वृत्तीचा असल्याने जे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडले ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडेल याबाबत मला नेहमीच शंका आहे, असे राऊतांनी म्हटले.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -