घर महाराष्ट्र 'वन नेशन वन इलेक्शन'पेक्षा फेअर इलेक्शन घ्या, संजय राऊत यांनी मोदी सरकारला...

‘वन नेशन वन इलेक्शन’पेक्षा फेअर इलेक्शन घ्या, संजय राऊत यांनी मोदी सरकारला सुनावले

Subscribe

देशात वन नेशन वन इलेक्शन घेण्यापेक्षा फेअर इलेक्शन घ्या, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून लगावण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी टीका केली आहे.

मुंबई : देशात यापुढे ‘ONE NATION, ONE ELECTION’ लागू करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी केंद्राने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सध्या विरोधकांच्या INDIA आघाडीची बैठक सुरू आहे. त्यामुळे यावरून लोकांचे दुर्लक्ष करण्यासाठी नवनलवे फंडे आणण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. देशात वन नेशन वन इलेक्शन घेण्यापेक्षा फेअर इलेक्शन घ्या, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून लगावण्यात आला आहे. (Sanjay Raut criticism of the Modi government on the issue of ‘One Nation One Election’)

हेही वाचा – One Nation-One Election : मोदी सरकार आणणार ‘एक देश – एक निवडणूक’ विधेयक, काय आहे फायदे-तोटे

- Advertisement -

मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडत आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला वन नेशन, वन इलेक्शनच्या मुद्द्यावरून आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मोदींच्या सरकारने काल एक ‘वन नेशन, वन इलेक्शन’ नावाने नवा फुगा हवेत सोडला. त्याआधी त्यांनी एक निशान, एक संविधान असे विधान त्यांनी केले होते. पण हे सर्व करण्याआधी सरकारने जम्मू-काश्मिर, मणिपूर या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात. वन नेशनच्या आधी फेअर इलेक्शन घ्या. भ्रष्ट इलेक्शन कमिशन बाजूला करा. भ्रष्ट इलेक्शन कमिशन असेपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन होणार नाही, अशी टीका राऊतांकडून करण्यात आली आहे.

वन नेशन वन इलेक्शन वो क्या होता है भाई? हा देश एक आहे ना? वेगळा आहे का? या देशात कोणी वेगळी गोष्ट कशी काय करू शकतो? हा वन नेशनच आहे ना? त्यात काही शंका आहे का? कोणाला शंका आहे? निवडणुकाही एक होतात. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्या ऐवजी फेअर इलेक्शन घ्या. हा आमचा नारा आहे. ‘वी वाँट फेअर इलेक्शन’. ते घेत नाही म्हणून वन नेशन इलेक्शन सुरू केले आहे. लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याचे हे षडयंत्र आहे, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

यावेळी संजय राऊतांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मुद्द्यावरून देखील केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे कारण काय. तेही गणपती उत्सवात. एरव्ही पंतप्रधान संसदेत येत नाही. आता अधिवेशन का? महाराष्ट्रातील खासदार गणपतीत बिझी असतात. महाराष्ट्रातील खासदार संसदेत पोहोचू नये म्हणून गणपतीत अधिवेशन घेतले आहे. हा गणेशोत्सवाविरोधात कट आहे. छळ आहे, असेही ते म्हणाले.

भाजपकडे अजेंडाच नाही. कोविंद राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. आता त्यांच्याकडे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीची धुरा दिली आहे. भाजपवाले इंडियाला घाबरले आहेत. त्यामुळे ते वेगवेगळे फंडे घेऊन येत आहेत. आमची मिटिंग सुरू आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या घोषणा होत आहेत, असेही संजय राऊत यांच्याकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले.

- Advertisment -