घरमहाराष्ट्रकोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो, भाजपवाले गांडुळासारखे..., संजय राऊतांचा घणाघात

कोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो, भाजपवाले गांडुळासारखे…, संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे. शिवसेना हाच 11 कोटी मराठी माणसाचा आवाज आहे. कोणी उठतो केंद्रातून पंतप्रधान आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. आणि इकडचे भाजपवाले गांडूळासारखे बसून असतात. महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरुद्ध प्रतिकार करेल. महाराष्ट्र खोटारडेपणाविरुद्ध लढेल, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय. 

मुंबईः शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे. शिवसेना हाच 11 कोटी मराठी माणसाचा आवाज आहे. कोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. आणि इकडचे भाजपवाले गांडूळासारखे बसून असतात. महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरुद्ध प्रतिकार करेल, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. त्यांचं (भाजपवाल्यांचं) लक्ष उद्या असायलाच पाहिजे. त्यांनी माजी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायलाच हवी. केंद्रीय तपास यंत्रणांचे जे प्रमुख आहेत, त्यांनी आवर्जून ऐकायला हवी, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय. शिवसेनेचे नेते संजय राऊत शिवसेना भवनाजवळ माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

उद्या शिवसेना हा पक्ष बोलणार नसून उद्या महाराष्ट्र बोलणार आहे. उद्या मराठी माणूस बोलणार आहे. उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे ते, तुमचे जे धंदे चालले आहेत ना ते उद्या कदाचित बंद होऊ शकतात, असंही संजय राऊत म्हणालेत. आता उपटसुंभ म्हणतील शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आहे का, मी म्हणतो होय. शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे. शिवसेना हाच 11 कोटी मराठी माणसाचा आवाज आहे. कोणी उठतो केंद्रातून पंतप्रधान आणि महाराष्ट्राची बदनामी करतो. आणि इकडचे भाजपवाले गांडूळासारखे बसून असतात. महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरुद्ध प्रतिकार करेल. महाराष्ट्र खोटारडेपणाविरुद्ध लढेल, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -


छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत. हा वंश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आम्ही सेनाभवनाखाली बाळासाहेबांच्या छपराखाली आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला लढण्याची मर्दानगी शिकवली आहे ना ती उद्या दिसेल. आमच्या रक्तातच धाडस आहे, आम्ही गांडूळ नाही आहोत. बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी माणसाला दमदाट्या कराव्यात, असं होणार नाही. आम्ही लढू, स्वतः उद्धव ठाकरेंचं उद्याच्या पत्रकार परिषदेवर बारीक लक्ष आहे. त्यांच्या सूचनेनुसारच उद्याची पत्रकार परिषद होणार आहे. ते जिथे बसणार आहेत, तिथून त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

विशेष म्हणजे काही तासांपूर्वीही संजय राऊतांनी भाजपला आव्हान दिलं होतं. आतापर्यंत खूप सहन केले, पण राजकारणातील मर्यादा आता भाजपने ओलांडली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या कोठडीत शेजारी दावा करणारे भाजपचे साडेतीन लोक हे येत्या दिवसात त्या कोठडीत दिसतील, अन् अनिल देशमुख बाहेर असतील असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचाः अनिल देशमुखांच्या कोठडीतच भाजपचे साडेतीन लोक लवकरच असतील – संजय राऊत

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -