घरताज्या घडामोडीभारतीय लोकशाहीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, बीबीसीच्या कारवाईनंतर राऊतांची टीका

भारतीय लोकशाहीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, बीबीसीच्या कारवाईनंतर राऊतांची टीका

Subscribe

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयटीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयावर छापे मारले असून कार्यालयातील अनेक पत्रकारांचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. या कारवाईनंतर विरोधकांकडून मोदी सरकार जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय लोकशाहीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. बीबीसीवरील धाडसत्र कधी संपेल हे सूचित करता येणार नाही. परंतु भारताच्या लोकशाहीची प्रतिमा आपण गमावत चाललो आहे. भारताची लोकशाही अबाधित आहे. न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता हे शेवटचे टिकलेले स्तंभ आहेत. भारतीय लोकशाहीसाठी आम्ही आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू! जय हिंद!, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -

५६ इंचाची छाती किती भित्री आहे – नाना पटोले

- Advertisement -

आयकर विभागाच्या कारवाईनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत मोदी यांच्यावर टीका केली आहे. बीबीसीने पंतप्रधान मोदींवर एक माहितीपट बनवला आणि लगेच बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे पडू लागले. ५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं, असं नाना पटोले म्हणाले.

काही दिवसांपूर्वी बीसीसीने द इंडिया क्वेशन (The India Question) नावाचा एक माहितीपट प्रसारित केला होता. गुजरातमध्ये सन २००२ ला दंगल उसळली. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. दंगल घडली तेव्हा मोदी यांची काय भूमिका होती यावर या डॉक्युमेंटरीमध्ये भाष्य करण्यात आले आहे. सोशल मिडिया व ऑनलाईन वाहिन्यांवर ही डॉक्युमेंटरी प्रसारीत करण्यात आली होती. मात्र, देशाची प्रतिमा मलीन होत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली. देशातील बहुतांश महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. त्यावरुन वादही झाला.


हेही वाचा : अदानीचे पाप झाकण्यासाठी बीबीसी कार्यालयावर धाडी, मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -