घरमहाराष्ट्र'कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार, त्यांना कृत्याची फळं...' राऊतांचा इशारा

‘कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार, त्यांना कृत्याची फळं…’ राऊतांचा इशारा

Subscribe

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. अशा या गुन्हेगाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटत असतील, तर त्यांची प्रवृत्ती आहे. हे सार महाराष्ट्र बघत आहे. हे दोघे एकमेकांना भेटत असतील, तर दोन घटनाबाह्य व्यक्ती भेटल्या तर त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं बघत नाहीत. परंतु माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची कायदेशीर फळं लवकरच भोगावी लागतील, असं म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि सोबतच राज्यपालांचं कृत्य हे चुकीचं असल्याचं म्हणत ताशेरे ओढले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.(  Sanjay Raut Criticized Ajit pawar over statement on Election seat distribution )

नेमकं काय म्हणाले राऊत ? 

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. अशा या गुन्हेगाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटत असतील, तर त्यांची प्रवृत्ती आहे. हे सार महाराष्ट्र बघत आहे. हे दोघे एकमेकांना भेटत असतील, तर दोन घटनाबाह्य व्यक्ती भेटल्या तर त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं बघत नाहीत. परंतु माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या कृत्याची कायदेशीर फळं लवकरच भोगावी लागतील, असं म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

- Advertisement -

भगतसिंह कोश्यारी यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला ते या देशाने, महाराष्ट्राने पाहिलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन घालवण्यासाठी भगतसिंग कोश्यारी यांनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केला, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांना भेटू शकतात.

डीएनए टेस्ट करावी लागेल

सगळ्यांची डीएनए टेस्ट करु आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजप युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत. अजित पवार काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येकजण आपाआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात. लोकसभेच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. असंही राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: BMC Election: भाजपला 60 च्या आत ऑलआऊट करू; राऊतांचा दावा )

अजित पवार काय म्हणाले होते?

जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या 44 जागा आहेत आणि 54 जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे 56 आमदार होते. हे गणित आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी डीएनए टेस्ट करावी लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -