Homeमहाराष्ट्रSanjay Raut : सहकार क्षेत्राबाबत बोलताना राऊतांनी अमित शहांना सुनावले, म्हणाले -

Sanjay Raut : सहकार क्षेत्राबाबत बोलताना राऊतांनी अमित शहांना सुनावले, म्हणाले –

Subscribe

अमित शहा हे महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या नेत्यांची बदनामी करण्यासाठी येतात, असे म्हणत खासदार संजय राऊतांनी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीकास्त्र डागले.

मुंबई : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. 25 जानेवारी) मालेगावात सहकार परिषदेला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्राचे कौतुक करत शरद पवारांनी 10 वर्ष केंद्रीय कृषीमंत्री असताना काय कार्य केले? याची माहिती द्यावी, असे आव्हान शहांकडून देण्यात आले. त्यांच्या या आव्हानाला उत्तर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा हे महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या नेत्यांची बदनामी करण्यासाठी येतात, असा टोलाच यावेळी राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut criticized Amit Shah Talking about cooperative sector)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 25 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमित शहा महाराष्ट्रात येथील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी येतात. शहा महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी आणि येथील जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात. ते देशाचे सहकार मंत्री आहेत. शहा जन्माला आले नव्हते तेव्हापासून महाराष्ट्रातले सहकार देशाला मार्गदर्शक आणि आदर्श आहे. पुण्याला वैकुंठलाल मेहता नावाने सहकार क्षेत्रातील सगळ्यात मोठी संस्था काम करते. ही संस्था महाराष्ट्रात आहे. पण शहा सहकार मंत्री झाल्यापासून राज्यातील सहकार क्षेत्राला घरघर लागली, असा आरोप यावेळी राऊतांनी केला.

हेही वाचा… Sanjay Raut : शहांवर टीका केल्याने शिंदेंना धडपडण्याची गरज नाही, राऊतांचा टोला

तसेच, सहकार क्षेत्रासाठी शरद पवार यांनी काय केले याचा हिशेब केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मागितला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकांना फोडण्यासाठी अमित शहा यांनी आपल्याकडील सहकार खात्याचा वापर केला. अनेक सहकार कारखान्यांचे संचालक, संस्थापक, चेअरमन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. सरकार कारखाने बंद करण्याचा दबाव आणला. अनेक कारखानदारांना दिल्लीत बोलावले. त्यांना ब्लॅकमेल करून भाजपामध्ये घेतले जाते, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे काम धनंजयराव गाडगीळ यांच्यापासून सुरू आहे. ग्रामीण भागाचे अर्थकारण सहकारावर आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत प्रत्येकाने सहकार चळवळ जिवंत रहावी, वाढावी यासाठी योगदान दिले, असेही राऊतांनी सांगितले.

याउलट गुजरातमध्ये सहकार क्षेत्रातील बँका लुटल्या जात आहेत. कोविड काळात, नोटबंदीच्या काळात गुजरातमधील सहकार बँकात कसे घोटाळे झाले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. महाराष्ट्रात सहकारी बँका विरोधा पक्षाच्या ताब्यात आहेत. ते बंद करण्याचे आणि सहकार कारखाने मोडून काढण्याच काम शहांनी केले. सहकार मंत्र्यांचे हे काम नाही. कारण एक कारखाना बंद पडतो तेव्हा त्यावर हजारो लोकांची कुटुंब उभी असतात. पण शहा हे व्यापारी राजकारणी आहेत. सहकाराचे दु:ख, वेदना त्यांना कळणार नाही. शहा शेअर मार्केटमधील व्यापारी असून सहकार क्षेत्र शेअर मार्केटप्रमाणे चालत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.