राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं होतं, विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना भागवत म्हणाले की, आतापासून सुरूवात केली तर तुम्ही म्हातारे होईपर्यंत अखंड भारत दिसेल, कारण आता परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. भारतापासून वेगळे झालेले देश पुन्हा भारतात विलिन होतील असं भागवत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या भूमिकेचं स्वागत असल्याचं म्हटलंय सोबतच केंद्र सरकारला टोलाही लगावला आहे. (Sanjay Raut Criticized BJP and RSS over Akhand Bharat said that reunite the Afghanistan Pakistan and Iran with Bharat )
राऊत म्हणाले की, अफगणिस्तान, इराण ,पाकिस्तान या देशांना भारतात विलिन करण्याचा प्रयत्न सुरू असेल तर त्याचं स्वागतच आहे. परंतु अखंड भारताचा अर्थ समजायला हवा. अखंड भारत म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा नाही. तर अखंड भारत म्हणजे या देशात सर्व जात, धर्माचे लोक आहेत त्यांच्या मनातही एकता आणि अखंडतेची भावना असायला हवी. देश हा लोकांमुळे तयार होतो. संघाचे प्रमुख भागवत जर का अखंड भारतावर बोलत असतील, तर अखंड भारत निर्माण करावा, परंतु अफगणिस्तान, पाकिस्तान आणि इराण यांना एकत्र आणा आपल्या देशाशी जोडा. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू नका, असंही राऊत यावेळी म्हणाले.
INDIA की भारत भाजपच्या मंत्र्यांचं उत्तर
देशाचे नाव INDIA वरून भारत असे बदलले जाऊ शकते, अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात देशाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे यावरून राजकारणही तापले आहे. विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहेत, तर सरकारकडूनही प्रत्युत्तर सुरू आहे. राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबरला G20 च्या शिखर परिषदेनिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये President Of INDIA ऐवजी President Of BHARAT असा उल्लेख करण्यात आल्याने आता INDIA आणि भारत या दोन शब्दावरून वाद निर्माण झाला आहे.
पण या सगळ्या प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री अनुगार ठाकूर यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. केंद्र सरकार या विषयावर आपली काही भूमिका असेल तर ते स्पष्ट करेल. परंतु, G-20 सारख्या मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस अशा अफवा पसरवत आहे, असे स्पष्टपणे अनुराग ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच, भारत या शब्दावर आक्षेप घेणारे लोक हे त्यांची मानसिकता दाखवून देत आहेत, असा टोला देखील ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे.
(हेही वाचा: India vs Bharat : नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर…, रोहित पवारांचे भाजपावर टीकास्त्र )