घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांचं दु:ख समजून घ्यायला गेलेले की सेनेच्या नेत्याला पक्षात घ्यायला?; राऊतांचा फडणवीसांवर...

शेतकऱ्यांचं दु:ख समजून घ्यायला गेलेले की सेनेच्या नेत्याला पक्षात घ्यायला?; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Subscribe

ऑफिसमध्ये एसीत बसून अग्रलेख लिहतात त्यांना शेतकऱ्यांचं दु:ख काय कळणार या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पलटवार केला. शेतकऱ्यांचं दु:ख समजून घ्यायला गेले होते की नांदेडला जाऊन शिवसेनेच्या माजी आमदाराला त्यांच्या पक्षात घेऊन जायला गेले होते, असं संजय राऊत म्हणाले. ते आज मुंबंईत माध्यमांशी बोलत होते.

ऑफिसमध्ये एसीत बसून अग्रलेख लिहतात त्यांना शेतकऱ्यांचं दु:ख काय कळणार अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर बोलताना संजय राऊत यांनी बोलूदेत असं म्हणत शेतकऱ्यांचं दु:ख समजून घ्यायला गेले होते की नांदेडला जाऊन शिवसेनेच्या माजी आमदाराला त्यांच्या पक्षात घेऊन जायला गेले होते, असा पलटवार केला. निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेच्या माजी आमदाराला त्यांच्या पक्षात घेऊन जायला गेले होते का? असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

गेली अनेक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकं स्वत:च्या पक्षात घेत होते. भाजपकडे स्वत:चं काही नाही आहे. काल निवडणूक लढण्यासाठी आमचा माणूस घेतला तो देखील रडका. शिवसैनिक परिस्थितीविरुद्ध हा रडत नाही लढतो. रडणाऱ्याला शिवसेनेत स्थान नसतं. पळपूट्यांना शिवसेनेत स्थान नसतं. भाजपने जे काय नवीन धोरण सुरु केलं आहे. स्वत:चं असं काही नसल्यामुळे दुसऱ्यांचे लोकं घ्यायचे आणि स्वत:ची सूज वाढल्याची दाखवायची. पण हे फार काळ चालत नाही, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा – शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची, पंतप्रधान मोदींची भूमिका आहे का?; राऊतांचा सवाल

- Advertisement -

मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करा; नाना पटोलेंची मागणी


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -