शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीसांचा मुखवटा फाडला – संजय राऊत

MP Sanjay Raut criticized the Agneepath scheme

शाहू महाराजांनी सत्य समोर आणल्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. भाजपने संभाजीराजेंचा सतत गैरवापर केला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराजांनी मुखवटा फाडला, असा टोला संजय राऊत यांनी यांना लगावला आहे. शिवसंपर्क अभियानावेळी कोल्हापूर येथे आयोजित  शिवसेनेच्या जाहीर सभेत बोलत होते. 

शिवसेनेने कधीही छत्रपती घराण्याचा अवमान केला नाही, असे शाहू महाराज म्हणाले. हा आम्हाला अंबाबाईने दिलेला आशीर्वाद आहे. आता तरी भाजपने शाने व्हावे. आम्ही संभाजीराजे यांना सन्मानाने पक्षात बोलवत होतो. मात्र, भाजपने संभाजीराजे यांचा गैरवापर केला. आज शाहू महाराज यांनी त्यांचा मुखवटा फाडला. त्याबद्दल मी शाहू महाराज यांचे आभार मानतो. शिवसेनेने कधीच छत्रपती घराण्याचा अपमाम केला नाही. आम्ही त्याचा कायम त्यांचा मान राखला आहे. भाजपने कारस्तान करून शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केले. याबरोबरच भाजपने तेढ निर्माण करण्याच काम केले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कोल्हापूरची भूमी क्रांतिकारक आहे. कोल्हापूरने शिवसेनेला भरपूर दिले आहे. कोल्हापूरची. जेंव्हा बेळगावमध्ये मराठी बांधवांची कोंडी केली जाते, त्यावेळी कोल्हापूर सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभा राहते, असे संजय राऊत यांनी म्हणाले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे यांच्या पोटात दुखायला लागले आहे. परंतु या सगळ्यांना पुरून शिवसेना महाराष्ट्रात उभा राहणार आहे. उद्धव ठाकरे कसे आहेत? कोल्हापुरातील एका शिवसैनिकाला अलगत उचलला आणि दिल्लीला नेऊन ठेवला, असे संजय राऊत म्हणाले.