घर महाराष्ट्र Sanjay Raut : "शरद पवारांच्या नावावर..." अजित पवार गटाला संजय राऊतांनी सुनावले

Sanjay Raut : “शरद पवारांच्या नावावर…” अजित पवार गटाला संजय राऊतांनी सुनावले

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याबाबत आता नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे.

मुंबई : जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री केले नाही, अशी टीका अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार यांचे अनेक वर्ष विश्वासू सहकारी राहिलेले दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. वळसे पाटील हे सध्या महायुतीच्या तीनचाकी सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. पण त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याबाबत आता नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. जे काही लोक राष्ट्रवादीतून निवडून आलेले आहेत, ते शपरद पवार यांच्या नावामुळे निवडून आले असल्याचा टोला राऊतांनी अजित पवार गटाला लगावलेला आहे. (Sanjay Raut criticizes Ajit Pawar’s group on Dilip Walse Patil’s statement)

हेही वाचा – ईशान्य मुंबईतून निवडणूक लढविण्याबाबत संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

- Advertisement -

राज्याचे सहकार मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत संजय राऊत यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शरद पवार यांच्या नावावर हे लोक निवडून आले आहेत. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी शरद पवार हे राज्याचे आणि देशाचे प्रमुख नेते आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांना जी सत्ता आणि पद प्राप्त झाली ती शपरद पवार यांच्या नावामुळे मिळाली. नाही तर आर. आर. पाटील यांच्यासारखे साधे कार्यकर्ते या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले नसते किंवा तुरुंगातून बाहेर आलेले छगन भुजबळ यांनी ताबडतोब मंत्रीपदाची शपथ घेतली नसती. हे सगळं काही शरद पवार करू शकतात. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे शरद पवारांमुळे आहेत.

ज्याप्रमाणे आम्ही म्हणतो की, शरद पवार नसते तर आम्ही कोण असतो. शेवटी ते प्रमुख नेता आहेत. त्यामुळे ते सर्व काही घडवत असतात. पक्ष किती लहान किंवा नेता किती लहान या सर्व नंतरच्या गोष्टी आहेत. पण आज आम्ही जे आहोत ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहोत. आज राष्ट्रवादीची लोक इकडे-तिकडे खुर्चीवर बसले आहेत, ते शरद पवार यांच्यामुळे आहेत. आजचा भाजप हा नरेंद्र मोदी यांच्यामुळे असून हे सत्य स्विकारले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -