घरमहाराष्ट्र"मोदी होते म्हणून...", अहमदाबादमध्ये मॅच आयोजित केल्याने संजय राऊतांचा मिश्किल टोला

“मोदी होते म्हणून…”, अहमदाबादमध्ये मॅच आयोजित केल्याने संजय राऊतांचा मिश्किल टोला

Subscribe

यंदाच्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल, अशी शक्यता होती. मात्र, विश्वचषकाचा अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु, यावरून ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला मिश्किल टोला लगावला आहे.

मुंबई : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC ODI WORLD CUP 2023) अंतिम सामना भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) यांच्यात आज (ता. 19 नोव्हेंबर) होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याआधी क्रिकेटचे महत्त्वाचे सामने हे मुंबईत खेळवले गेले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल, अशी शक्यता होती. मात्र, विश्वचषकाचा अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु, यावरून ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला मिश्किल टोला लगावला आहे. (Sanjay Raut criticizes PM Narendra Modi for organizing match in Ahmedabad)

हेही वाचा – ICC WC 2023 : IND-AUSमध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी होणार महामुकाबला

- Advertisement -

विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या देशात काहीही होऊ शकतं. कालपर्यंत हा खेळ होता. संपूर्ण देश त्यामध्ये सहभागी होता. आता यामध्ये भारतीय जनता पक्ष सहभागी झाला आहे. हा खेळ राहिला नाही. हा इव्हेंट झाला आहे. आपण जाऊन पाहा, भाजपचे लोक संध्याकाळी सांगतील की मोदी होते म्हणून आम्ही जिंकलो. मोदी होते म्हणून अशी बॉलिंग पडली, अशी गुगली पडली. मोदींनींच मंत्र दिला अमित शाहा क्रिकेटच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करत होते. हे लोक खेळालाही सोडायला तयार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच, क्रिकेटच्या इव्हेंटपासून ज्यांना आनंद घ्यायचा त्यांनी घ्या. पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती. क्रिकेटचे सर्व महत्त्वाचे सामने हे दिल्ली, कोलकात्यातील ईडन गार्डन किंवा मुंबईत होत असत. पण आता मुंबईतून संपूर्ण क्रिकेट हे अहमदाबाद हलवण्यात आले आहे. कारण त्यांना राजकीय इव्हेंट करायचा आहे. मोदी थे इसलिये हम जीत गये, मोदी है तो वर्ल्ड कप की जीत मुनकिन है, असे हे भाजपचे लोक बोलतील, असा टोला लगावत संजय राऊत म्हणाले की, भारतीय संघाचाला माझ्या शुभेच्छा आहेत. आपण जरुर जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आजच्या या सामन्याला नरेंद्र मोदी हे स्वतः हजर राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -