घरताज्या घडामोडीसीबीआय, ईडीची भीती दाखवू नका, अंगावर याल तर तुडवले जाल, राऊतांचा भाजपला...

सीबीआय, ईडीची भीती दाखवू नका, अंगावर याल तर तुडवले जाल, राऊतांचा भाजपला थेट इशारा

Subscribe

शिवसेनेचा बाणा सर्वांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. हे सगळे लोकं आज जे पीरपीर करत आहेत ते शिवसेनेच्या पायाशी असतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे

महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येतो. भाजपकडून राज्यात कुटील कारस्थान करण्यात येत याविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवू नका अंगावर याल तर तुडवले जाल असा थेट इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. नुसती कट कारस्थाने करुन चालणार नाही. काही वर्षानंतर शिवसेनेविरोधात बोलणारे पायाशी येतील असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरुन भाजपला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले की, केंद्रीय यंत्रणेंची भीती नका आम्हाला दाखवू, सीबीआय, ईडी, आयकर यांना आम्ही भीत नाही. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तुडवले जाणार अशा प्रकारची शिवसेनेची माती आहे असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

आजचा दिवस पवित्र आहे. शिवसेनेची स्थापना अग्नितुन झाली आहे. या अग्निमध्ये समिधा टाकण्याचे काम आपण सातत्याने करत असतो. अयोध्येत जेव्हा गेलो तेव्हा आदित्य ठाकरे पोहोचण्यापूर्वी काही लोकं भेटले. स्वागत करण्यासाठी उत्सुक होते. बाळासाहेबांचे नातू येत आहेत. हिंदुत्वाच्या महान शिलेदारांचा नातू येत आहे. या भावनेतून लखनऊपासून अयोध्येपर्यंत स्वागत करण्यासाठी हजारो जण उपस्थित होते. शिवसेनेचा विचार असाच राहिल. उद्धव ठाकरे आगे बढो हम आपके साथ है असे संजय राऊत म्हणाले.

फडणवीस कारस्थान करुन चालणार नाही

मीस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य करता येणार नाही. राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावे लागेल आणि ती क्षमता फक्त शिवसेनेच्या नेतृत्वाकडे आहे. शिवसेनेचा इतिहास महाराष्ट्रातील राजकारणातील धगधगता इतिहास आहे. बाळासाहेबांनी ५६ वर्षांपूर्वी अन्यायाविरोधात ठिणगी टाकण्याचे काम केले. न्यायाच्या लढाईत कोणी पुढे असेल तर ती शिवसेना आहे. शिवसेनेच्या अंगावर किरकोळ लोकं खूप सोडले, राणा बाणा काणा पण शिवसेनेचा बाणा, स्वाभिमानाचा बाणा, राष्ट्रीय बाणा, मराठी बाणा अन्यायाविरोधात लढण्याचा बाणा हा सर्वांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. हे सगळे लोकं आज जे पीरपीर करत आहेत ते शिवसेनेच्या पायाशी असतील असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : तेरा घमंड चार दिन का है, पगले हमारी बादशाही खानदानी है, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -