Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'ही फूट नाही तर काय'? राऊतांचा थेट शरद पवारांना प्रश्न

‘ही फूट नाही तर काय’? राऊतांचा थेट शरद पवारांना प्रश्न

Subscribe

राष्ट्रवादीमध्ये दोन अध्यक्ष आहेत, एक जयंत पाटील आणि दुसरे सुनिल तटकरे. तसंच, अजित पवार गटानं शरद पवार यांची अध्यक्षपदावरून हकलापट्टी केली आहे. त्यामुळे ही फूट नाही तर काय आहे?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग‌ेसमधून एक गट फुटून भाजपसोबत सत्तेत गेला. या पक्षातील एक गट हा पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन अध्यक्ष आहेत, एक जयंत पाटील आणि दुसरे सुनिल तटकरे. तसंच, अजित पवार गटानं शरद पवार यांची अध्यक्षपदावरून हकलापट्टी केली आहे. त्यामुळे ही फूट नाही तर काय आहे? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांना विचारला आहे. काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं म्हटलं आहे. (Sanjay Raut directly asked question to Sharad Pawar on NCP Split)

राऊत म्हणाले की, लोकांमध्ये संभ्रम नाही. राष्ट्रवादीत फूट पडली आहे. एका गटाने ईडीच्या भीतीने भाजपसोबत हातमिळवणी केली. शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग महाविकास आघाडीसोबत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. आम्ही ठरवलं आहे, महाराष्ट्रात. देशपातळीवर भाजपचा पराभव करायचा आहे. आम्ही जयंत पाटील, शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीबद्दल चर्चा करतो. आम्ही तटकरे किंवा अजित पवार यांच्याशी बोलत नाही, असं वक्त्यही राऊतांनी केलं.

- Advertisement -

शरद पवार हे भाजपसोबत कधीही जाणार नाहीत. त्यांना भाजपचे विचार मान्य नाहीत. भाजपची जी भूमिक आहे, ती त्यांची वैचारिक भूमिका कधीही नव्हती. शरद पवार यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानतात. त्यांना भाजपचा विचार मान्य नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.

(हेही वाचा: काही ठराविक लोकांनी टार्गेट करून..; सत्यजित तांबेंचं मोठं विधान, कॉंग्रेसमध्ये परतणार? )

- Advertisement -

तसंच, राऊत म्हणाले की शरद पवार हे महाविकसा आघाडीचे नेते आहेत. इंडिया आघाडीत देशातील प्रमुख राजकीय पक्षाच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात गट निर्माण झाला आहे. त्या गटाचे शरद पवार हे प्रमुख घटक आहेत, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांनी बाजू मांडली.

- Advertisment -