Homeमहाराष्ट्रSanjay Raut : भाजपा सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स - संजय राऊत

Sanjay Raut : भाजपा सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स – संजय राऊत

Subscribe

नमो महारोजगार मेळावा तुमच्या पिताश्रींचा आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी राज्य सरकारला केला आहे.

मुंबई : भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांमुळे राज्यात डर्टी पॉलिटिक्स झाले आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नमो महारोजगार मेळाव्यावरून संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नमो महारोजागर मेळाव्यावरून सरकारवर टीका करताना संजय राऊत म्हणाले,”हा महारोजगार मेळावा सरकारचा आहे. ही भाजपा किंवा शिंदे गँगची योजना नाही ना. विद्यामान खासदार आणि आमदार हे त्या सरकारी योजनेचा भाग असतात आणि तुम्ही त्यांना बोलवत नाही. अशा प्रकारचे डर्टी पॉलिटिक्स हे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आल्यापासून सुरू झाला आहे. यापूर्वी आधी राज्यात कधीच झाले नव्हते. हे डर्टी पॉलिटिक्स हे अलीकडच्या काळात सुरू झाले आहेत”, अशी टीकार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – Gokhale Bridge : गोखले पुलाच्या कामात पालिकेकडून चूक; चालक वैतागले, जबाबदारी कोण घेणार?

वाळी सुसंस्कृत राजकारणाला लागली

संजय राऊत म्हणाले, “आपल्याच आमदारांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षातील आमदारांना निधी द्यायचा नाही. तुमचा आमदारांची वाद असेल पण ज्या जनतेने त्या आमदाराला निवडून दिले आहे. तो मतदारसंघ महाराष्ट्रात नाही का? राज्यात हा कोणता खेळ सुरू आहे. पैसे तुमच्या झाडला लागले आहेत का? तुमच्या वर्षा, सागर आणि देवगिरी बंगल्यांच्या झाडाला खोके लागले आहे का? तिथे जमिनीतून खोके उगवतात का? मर्जीप्रमाणे कार्यक्रम करायचे आणि स्थानिक आमदार आणि खासदारांना निमंत्रण देणे हा कुठला प्रकार आहे? केंद्रा नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभव सत्तेत आल्यापासून ही वाळी सुसंस्कृत राजकारणाला लागली आहे.”

हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपा उमेदवारांची अंतिम यादी तयार; ‘या’ मतदारसंघात ‘हे’ दिग्गज नेते

महारोजगार मेळावा तुमच्या पिताश्रींचा आहे का?

महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण कधीच झाले नव्हते. सरकार ज्या भागात जाते, त्या राज्याचा आमदार आणि खासदार हा आपल्या पक्षाचा नाही. त्यामुळे त्या आमदार आणि खासदार सरकारी कार्यक्रमाला बोलवायेच नाही. हा नमो महारोजगार मेळावा तुमच्या पिताश्रींचा आहे का? असा सवाल संजय राऊतांनी राज्य सरकारला केला आहे.