घरमहाराष्ट्रSanjay Raut: विधानसभा बरखास्त करा; संजय राऊतांचं राज्य सरकारला आव्हान, म्हणाले, गुंडांनी...

Sanjay Raut: विधानसभा बरखास्त करा; संजय राऊतांचं राज्य सरकारला आव्हान, म्हणाले, गुंडांनी राज्याचा ताबा…

Subscribe

सात गुंडांचे मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत राऊतांनी टीका केली.

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिंदे सरकारवर गंभीर आरोप करत आहेत. गुंडांसोबतचे फोटो शेअर करत संजय राऊत शिंदे पिता-पुत्रावर गंभीर आरोप करत आहेत. सात गुंडांचे मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत राऊतांनी टीका केली. त्यानंतर आता त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. विधानसभा बरखास्त करा, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, कारण राज्याचा गुंडांनी ताबा घेतला आहे, असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut Dissolve Assembly Sanjay Raut s challenge to the state government he said goons have taken over the state)

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचेच राज्य सुरू आहे आणि त्याला पंतप्रधान मोदी व अमित शाह जबाबदार आहेत. गुंड खुलेपणाने राज्यकर्त्यांना भेटू शकतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शिवसेनेचे युवा नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरूवारी मॉरिस याने गोळ्या झाडून हत्या केली. बंदूक चालवण्याचा हा आत्मविश्वास आला हेच गुंडाराज. हा आत्मविश्वास गुंडांना मोदी-शहा, शिंदे-फडणवीसांमुळे मिळत आहे, असं म्हणत संजय राऊतांनी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती राजवट लावा

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यात तुम्ही लक्ष घाला. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालं आहे. गुंडांनी राज्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी, अशी आमची मागणी आहे. ताबडतोब निवडणुका घ्याव्यात. नाहीतर गुंड इथे हैदोस घालतील. हा हैदोस चालू आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

राऊत म्हणाले की, पुण्यात निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वभंर चौधरी यांच्यावर हल्ला झाला. तिथल्या पोलीस आयुक्तांनी चार्ज घेतला तेव्हा काही गुंडांची ओळख परेड केली होती. काल ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला, त्यांची परेड का नाही केली? पोलीस आयुक्त घाबरले का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचं समर्थन करत आहेत. पोलीस आयुक्तांनी ही नौटंकी बंद करावी. हे हल्ले करणाऱ्या राजकीय गुंडांचीही परेड करा. त्यांच्या हातात बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा. जर तुम्ही असं केल तर तुम्ही पोलीस आयुक्त, नाहीतर तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते, असं थेट आव्हान संजय राऊतांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना केलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Bihar News: तेजस्वी यादव यांच्या घरी 76 आरजेडी आमदार नजरकैदेत; लालू यादव यांच्या पक्षातून ‘हे’ आमदार बेपत्ता )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -