घरमहाराष्ट्रSanjay Raut : निवडणूक आयोगही भाजपाच्या गाभाऱ्यात डोळे मिटून... संजय राऊतांची बोचरी...

Sanjay Raut : निवडणूक आयोगही भाजपाच्या गाभाऱ्यात डोळे मिटून… संजय राऊतांची बोचरी टीका

Subscribe

मुंबई : तेलंगणाच्या प्रचारास जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बालाजी तिरुपतीच्या मंदिरात पोहोचले. कपाळास चंदन, भस्म लावून ते मंदिरात पूजा-अर्चा करीत असल्याचे चित्र सर्वत्र झळकले. हा प्रचाराचाच एक भाग झाला. त्याआधी ते मथुरेत जाऊन कृष्णचरणी लीन झाले. त्यात श्रद्धा कमी आणि प्रसिद्धी, प्रचार जास्त. पाच राज्यांतील निवडणुका सरकारच्या कामांवर, विकासाच्या मुद्द्यावर नाही, तर सरळसरळ जातीय, धार्मिक, ध्रुवीकरण करून लढवल्या जात आहेत, पण आपला निवडणूक आयोगही भाजपाच्या गाभाऱ्यात डोळे मिटून ध्यानस्थ बसला आहे, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा – Telangana Assembly Elections Result : काँग्रेस-बीआरएसमध्ये तेलंगणात अटीतटीची लढत

- Advertisement -

आता 22 जानेवारी 2024ला पंतप्रधान मोदी हे अयोध्येत जाऊन राममंदिराचे लोकार्पण करणार. म्हणजे 2024च्या भाजपा प्रचाराचा आणखी एक उत्सव देशभरात साजरा होईल. राममंदिराच्या अक्षता देशातील घराघरांत पोहोचवून 2024च्या प्रचाराचा मुहूर्त साधला जाईल. शेवटी देशापेक्षा धर्म महत्त्वाचा व त्याच धर्माची ढाल पुढे करून पंतप्रधान मोदी पुन: पुन्हा निवडणुकांना सामोरे जात आहेत. विकासाचा मुद्दा कोठेच नाही, अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील रोखठोक सदरातून केली आहे.

मोदी आणि त्यांचा पक्ष देव देव करीत निवडणुका लढवत आहे. देश पुरातन युगात नेण्याचा हा प्रकार. आधुनिकतेची कास धरायची, विज्ञानाचा मार्ग स्वीकारायचा, की मोदींच्या पुरातन मार्गाने जायचे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MP Election Results : पंतप्रधानांच्या 10 दिवसांत 15 रॅली; किती फायदा, किती तोटा?

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील. हे निकाल संध्याकाळपर्यंत ‘2024’चे देशाचे भविष्य ठरवतील. तेलंगणाचे मतदान सगळ्यात शेवटी म्हणजे 30 नोव्हेंबरला झाले. तेलंगणात भाजपा कोठेच नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हैदराबादेत प्रचारास गेले आणि त्यांनी जाहीर केले की, तेलंगणात आमचे सरकार आले तर हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू. हैदराबादचे ‘भाग्यनगर’ केल्याने देशाचे व जनतेचे कोणते प्रश्न सुटणार? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – MP Election Results : मध्य प्रदेशात ‘कमळ’ की कमलनाथ? निकालातून होणार चित्र स्पष्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -