घरताज्या घडामोडीसंजय राऊत- राहुल गांधी भेट, राऊतांनी सांगितले भेटीमागचे कारण

संजय राऊत- राहुल गांधी भेट, राऊतांनी सांगितले भेटीमागचे कारण

Subscribe

राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त - संजय राऊत

खासदार संजय राऊत संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये खासदार आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी होत आहेत. शिवसेना नेते आणि संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीवरुन महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याचे संजय राऊत यांनी स्वतः सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली आहे. राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केली असल्याचे संजय राऊत यांनी बैठक झाल्यानंतर सांगितले आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती दिली आहे. “खासदार राहुल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले” अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

- Advertisement -

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याचे दिसून येत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणूक काँग्रेसनं लढवल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची घेतलेली भेटीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शिवसेना खासदारांची अर्थमंत्र्यांना भेट

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. राज्यातील पुरपरिस्थितीच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा. मदत निधी तातडीने मंजूर करावा या मागण्या अर्थमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे, खासदार फौजिया खान उपस्थित होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -