…म्हणून भावना गवळी यांना चीफ व्हिप पदावरून हटवले, संजय राऊत यांनी केला खुलासा

शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील चीफ व्हिप पदावरून दूर केले आहे. यावर आज खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

Sanjay Raut

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील चीफ व्हिप पदावरून दूर केले आहे. यावर आज खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाल संजय राऊत – 

व्हीप बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद पदाचं महत्त्व फार असतं. पुढच्या अडीच वर्षात अनेक निर्णय होतील. कामाला गती मिळायला हवी. भावना गवळी उत्तम काम करत होत्या. पण त्यांच्या काही कायदेशीर लढायांमुळे त्यांना दिल्लीत संसदेत उपस्थित राहाता येत नाही असं अनेकदा दिसलं. अशा वेळी तिथे संसदेत मुख्य प्रतोद म्हणून व्यक्ती उपस्थित राहाणं आवश्यक असतं. काही आदेश काढायचे असतात, काही व्हीप काढायचे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुढे त्यांनी काल आम्ही संसदीय पक्षातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवले आहे. पुढील अडीच वर्षांत अनेक निर्णय घेतले जाणार आहेत. अशा वेळी कामाला गती मिळायला हवी हे महत्त्वाचे आहे. भावना गवळी या उत्तम काम करत होत्या. मात्र, त्यांच्या काही कायदेशीर लढाया सुरू आहेत. त्यामुळे त्या दिल्लीत संसदेत काही वेळा येत नाहीत. त्या मधल्या काळात कायदेशीर पेचात सापडल्या होत्या. अशा वेळी चीफ व्हिप म्हणून व्यक्ती संसदेत हजर असायला हवी. कारण अशा वेळी चीफ व्हिपची फार गरज असते. पक्षाचे आदेश काढायचे असतात. त्यामुळे  उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार अमलबजावणी करण्यात आली आहे, अशा शब्दांत राऊतांनी निर्णयामागचे कारण सांगितले.

राजन विचारे यांची लोकसभेतील मुख्य प्रतोदपदी नियुक्ती –

बुधवारी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिंदे गटानं प्रतोद बदलल्यामुळे उद्धव ठाकरेंना  मोठ्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी सतर्कतेचा उपाय म्हणून शिवसेनेनं प्रतोद बदलल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.