घरमहाराष्ट्रSanjay Raut : "अजित पवार वाघाच्या नाही लांडग्याच्या भूमिकेत...", संजय राऊतांनी सुनावले

Sanjay Raut : “अजित पवार वाघाच्या नाही लांडग्याच्या भूमिकेत…”, संजय राऊतांनी सुनावले

Subscribe

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा झाली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. ही शेवटची निवडणूक आहे असे भावनिक आवाहन करण्यात येईल, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहित, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत. शरद पवार यांनी एवढे मोठे साम्राज्य उभे केले नसते तर तुम्ही कुठे असता, माणसाने इतके कृतघ्न असू नये, असे राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut expressed anger over Ajit Pawar statement about Sharad Pawar)

हेही वाचा… Sanjay Raut : बाळराजांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज, राऊतांनी साधला श्रीकांत शिंदेंवर निशाणा

- Advertisement -

शरद पवार यांच्यावर अजित पवारांनी अनेकदा वयावरून टीका केली आहे. परंतु, बारामतीमधील भाषणात त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी अजित पवारांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देत म्हटले की, अजित पवार इतके निर्दयी होतील, असे मला वाटले नव्हते. ज्या शरद पवार यांनी त्यांना खाऊ पिऊ घातले, त्यांना वाढवले, प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांच्याबाबत असे वक्तव्य करणे योग्य नाही. ते या नव्या कळपात गेल्यापासून लांडग्यांच्या भूमिकेत गेले आहेत. त्यांना मी आता वाघ नाही बोलणार. कारण वाघाला काळीज असते, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

शरद पवार यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात. पण ते आज पवारांमुळे सुखाचे चार घास खात आहेत. त्यांच्यामुळे ते इतकी माया उभी करू शकले आहेत. जर का शरद पवार यांनी एवढे मोठे साम्राज्य उभे केले नसते तर ते कुठे असते? अजित पवार तुम्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवर फिरत होतात. हे आम्ही पाहिले आहे. आज तुम्ही जे काही आहात ते शरद पवार यांच्यामुळे आहात. पण माणसाने इतकेही कृतघ्न असू नये, असे म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

- Advertisement -

अजित पवार यांनी एकदा आपल्या भाषणात मोदी मला ओळखतात, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचारही राऊतांनी घेतला. याबाबत ते म्हणाले की, अजित पवार म्हणतात की मोदी मला ओळखतात, त्यांना भेटलो की, ते माझ्याकडे पाहून हसतात. परंतु, हे तेच मोदी आहेत, ज्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. हे अजित पवार विसरले का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही म्हणतात, मला अमित शहा ओळखतात. पण तेच अमित शहा शिंदेंना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यामुळे मोदी-शहा यांना हे कितीही ओळखत असले तरी त्यांना आम्ही चांगलेच ओळखतो, असा टोलाही राऊतांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -