Homeमहाराष्ट्रSanjay Raut : या देशात न्यायाची अपेक्षा नाही, राऊतांनी व्यक्त केला संताप

Sanjay Raut : या देशात न्यायाची अपेक्षा नाही, राऊतांनी व्यक्त केला संताप

Subscribe

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त केला. या देशात न्यायाची अपेक्षा ठेवता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. पण न्यायाच्या दारातही अन्याय झाल्याचे मत ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी म्हटलेल्या विधानाचा दाखला देत राऊतांनी या देशात न्यायाची अपेक्षा ठेवता येत नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. याबाबत बोलताना राऊतांनी आपला संताप व्यक्त केला. मंगळवारी (ता. 28 जानेवारी) खासदार राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधवा. त्यावेळी ते बोलत होते. (Sanjay Raut expressed his anger saying that justice cannot be expected in India)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले की, आमदार ज्यांनी पक्षांतर केले, ते अपात्र ठरतील. बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल, असे वाटले होते. पण या देशामध्ये न्यायाच्याबाबतीत अपेक्षा ठेवता येत नाहीत. आजच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितले आहे की, या देशाचे सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली आहे. न्यायमूर्ती मदन लोकर ज्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केले. त्यामुळे ते अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश आहेत. ते म्हणत आहेत की, आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्टापासून सरकारच्या दबावाखाली आहे आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेत आहेत. त्यामुळे अशावेळी ज्यावेळी एखादे न्यायाधीश सांगतात ते चुकीचे नसू शकते, असे यावेळी राऊतांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… SS UBT On President : राष्ट्रपती भवन हा रबरी शिक्काच, ठाकरे गटाची सडकून टीका

तसेच, न्यायमूर्ती मदन लोकूर हे इतर न्यायमूर्तींप्रमाणे निवृत्त झाल्यानंतर बोललेले नाहीत. ते ज्यावेळी त्यांच्या पदावर होते, तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ज्या चार न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये मदन लोकूर यांचा समावेश होता. ते अत्यंत बेदरपणे काम करणारे न्यायमूर्ती आहेत, त्यांनीच सांगितले की न्याय मिळत नाही. न्यायासाठी आणि निकालासाठी दबाव येतो. त्यामुळे चंद्रचूड हे जे काही तीन वर्ष मैदानात खेळत राहिले, त्यांनी केवळ बॉल घासण्याचे काम केले. त्यांनी तर विकेट घेतलीच नाही, असा टोला यावेळी खासदार संजय राऊतांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना लगावला आहे.