Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : महायुतीत कोण होणार मुख्यमंत्री? राऊतांनी स्पष्टच सांगितले...

Sanjay Raut : महायुतीत कोण होणार मुख्यमंत्री? राऊतांनी स्पष्टच सांगितले…

Subscribe

निवडणुकांचा निकाल येऊन तीन दिवस उलटलेले असतानाही महायुतीमधून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे मात्र निश्चित होऊ शकलेले नाही. पण याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

मुंबई : राज्यात महायुती सरकारला महाविजय मिळविण्यात यश मिळाले आहे. 288 जागापैकी महायुतीने राज्यात तब्बल 230 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. मविआला यंदाच्या निवडणुकीत केवळ 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पण आता निवडणुकांचा निकाल येऊन तीन दिवस उलटलेले असतानाही महायुतीमधून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे मात्र निश्चित होऊ शकलेले नाही. पण याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. नैतिकतेच्या आधारावर पाहिले तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील, असे राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut expressed his clear opinion about post of Chief Minister in the Mahayuti)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता. 26 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महायुतीतील मुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा करण्यात आली. ज्याबाबत त्यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमतापर्यंत पोहोचलेला आहे. पूर्ण बहुमत नसले तरी भाजप खरेदी-विक्रीमध्ये माहीर आहे. त्यामुळे ते शिंदे-अजित पवारांचा पक्षही फोडू शकतात. कोण मुख्यमंत्री होणार यामध्ये मला रस नाही. आज 26 तारीख असून विधानसभेची मुदत संपत आहे. सरकार स्थापनेचा शेवटचा दिवस आहे. आम्ही सरकार बनवू अशी परिस्थिती निर्माण झालेली तेव्हा 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल अशा धमक्या दिल्या जात होत्या आणि आता हेच लोक घटनेमध्ये अशी तरतूद नसल्याचे बोलत आहेत. याचा अर्थ कायद्याचे राज्यात यांच्यासाठी वेगळा नियम आणि इतरांसाठी वेगळा नियम, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : बेकायदेशीर नेमणुका सहन कराव्या लागणार, रश्मी शुक्लांच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

तसेच, आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल अशी आम्हाला आशा आहे. राज्याला एक नेतृत्व मिळावे असे वाटते. ते कोण असेल हे शेवटी दिल्लीतील अमित शहा किंवा नरेंद्र मोदी ठरवतील. भाजपाकडे स्वत:चे बहुमत असल्याने त्यांचा सरकार स्थापनेचा हक्क आहे, असे वाटते. यावेळी त्यांनी महायुतीत चर्चा होणाऱ्या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर देखील चर्चा केली आहे. आम्ही सांगत होतो तेव्हा हा फॉर्म्युला मान्य नव्हता. तेव्हाच हा फॉर्म्युला मान्य केला असता तर अनेक घडामोडी टळल्या असत्या. पण फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता म्हणून तो फॉर्म्युला पाळला नाही. पण आता ते काहीही करायला तयार आहेत. यातून महाराष्ट्र आणि शिवसेनेविषयी त्यांच्या मनात किती द्वेष आहे हे दिसते, असे यावेळी खासदार संजय राऊतांकडून सांगण्यात आले.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -