घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबादेतील कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या, संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

औरंगाबादेतील कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या, संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

Subscribe

आज औरंगाबादेतील पहिल्या शाखेचा 38 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. पण या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या पाहुन राऊतांकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे.

आज (ता. 08 जून) औरंगाबादेतील पहिल्या शाखेचा 38 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. पण या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या पाहुन राऊतांकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे. तर आजच्या कार्यक्रमाला कार्यकर्ते का आले नाहीत, याचे पदाधिकाऱ्यांनी आत्मनिरीक्षण करावे, असा सल्ला यावेळी संजय राऊत यांनी दिला. या कार्यक्रमाला चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विनोद घोसाळकर हे उपस्थित होते.

हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांवर विश्वास; राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

मराठवाड्यातील औरंगाबादमधील पहिली शिवसेनेची शाखा 8 जून 1985 रोजी सुरु करण्यात आली होती. या शाखेच्या 38 व्या वर्धापन दिनाला संजय राऊत हजर होते. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “बाळासाहेबांनी मुंबईत शिवसेना स्थापन करून 50 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटून गेला. ज्यावेळी बाळासाहेबांनी मुंबईत शिवसेना स्थापन केली तेव्हा लोक असे बोलत होते की, ही शिवसेना मुंबई, ठाण्याच्या पुढे जाणार नाही. ही शिवसेना पाच-सहा महिन्यांत बंद होईल, पण बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही शिवसेना नव्हती, तो फक्त एक पक्ष नव्हता, ती फक्त एक संघटना नव्हती. तो एक ज्वलंत धगधगता विचार होता. हि शिवसेना आज सर्वदूर पोहोचली आहे. मराठवाडा, विदर्भ सगळीकडे शिवसेना आहे.”

आज अनेक जणांची भाषणे ऐकली. काही भाषणे ऐकताना कंटाळा आला. त्यामुळे भाषण करताना कधी थांबायचे हे कळले पाहिजे, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. शिवसेनेचा इतिहास छान आहे. या धगधगत्या इतिहासामुळे आज शिवसेना टिकून आहे, पण या इतिहासासोबत भूगोलाचा अभ्यास केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी खोचक टिप्पणी केली.

- Advertisement -

याआधी अनेकदा मराठवाड्यात आलो. पण कधी खुर्च्या कमी पाहिल्या नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे हे असे का घडले? याचे आपल्या प्रमुख नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला देखील यावेळी संजय राऊत यांच्याकडून देण्यात आला आहे. या सभागृहात फक्त पदाधिकारी आले आहेत, त्यांनी आपल्या सोबत 10-10 शिवसैनिक आणलेले नाहीत. ते का आले नाही, याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे, असेही राऊत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे ठाकरे गट मात्र चांगलाच नाराज झाला आहे. पण लोकांमध्ये ठाकरे गटाबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोकांची गर्दी पाहायला मिळते. तर संजय राऊत यांच्या कार्यक्रमांना देखील लोक स्वतःहून उपस्थित असतात. त्यामुळे आजच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या संजय राऊत यांच्या चांगल्याच मनाला लागल्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -