घरताज्या घडामोडीसंजय राऊतांचं नक्की म्हणणं काय? फेसबुकवर म्हणाले, 'संभाल के रखिये'!

संजय राऊतांचं नक्की म्हणणं काय? फेसबुकवर म्हणाले, ‘संभाल के रखिये’!

Subscribe

शिवसेना खासदार आणि महाविकासआघाडी स्थापन होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी सकाळीच टाकलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर महाविकासआघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यामध्ये जसे शिवसेनेचे आमदार आहेत, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले देखील आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीच्या सरकारच्या ‘नमनालाच घडाभर तेल’, असं काहीसं चित्र सध्या राज्यात निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना देखील उद्धव ठाकरेंनी मंत्रिंमडळात स्थान दिलं नसल्यामुळे ही नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात, संजय राऊत यांनी नाराजी नसल्याचंच ठामपणे म्हटलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी टाकलेली पोस्ट मात्र अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. राजकीय वर्तुळातील विश्लेषक या पोस्टचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करू लागले आहे. सकृतदर्शनी तरी ही पोस्ट संजय राऊतांची नाराजीच व्यक्त करणारी वाटत आहे.

sanjay raut fb post
संजय राऊत यांनी केलेली फेसबुक पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली.

‘हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपको ये तीन भेंट दी हो.. साथ, समय और समर्पण’, असं लिहिलेली ही पोस्ट नक्की संजय राऊतांनी कुणासाठी आणि कुणाला उद्देशून लिहिली असावी, याविषयी चर्चा सरू झाली आहे. ही पोस्ट त्यांच्या स्वत:बद्दल आहे का? त्यांच्या बंधूंबद्दल आहे का? ती उद्धव ठाकरेंना उद्देशून आहे का? महाविकासआघाडीतल्या तिनही पक्षांमधल्या नाराजांसाठी ती पोस्ट आहे का? असे अनेक प्रश्न या पोस्टने निर्माण केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मंत्रिपद मिळाले असते तर उद्धव ठाकरेंनाच फायदा झाला असता-भास्कर जाधव

नाराज नाही, तर अशी पोस्ट का?

मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी संजय राऊत शपथविधीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भावाला मंत्रिपद न मिळाल्यामुळेच संजय राऊतांनी कार्यक्रमाला जाणं टाळलं, असं देखील म्हटलं गेलं. मात्र, ‘मी सरकारी कार्यक्रमांना जात नाही, उद्धव ठाकरेंचा शपथविधी हा फक्त एक अपवाद होता. म्हणून या कार्यक्रमाला गेलो नाही’, असं म्हणत संजय राऊतांनी नाराजीतं वृत्त फेटाळून लावलं होतं. मात्र, या पोस्टमुळे संजय राऊतांच्या मनातली नाराजीच व्यक्त झाली असल्याचं बोललं जात आहे. ही पोस्ट त्यांनी उद्धव ठाकरेंनाच उद्देशून लिहिली असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -