Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र कोश्यारींचा राजीनामा मंजूर होताच राऊत कडाडले, महाराष्ट्रावर फार उपकार...

कोश्यारींचा राजीनामा मंजूर होताच राऊत कडाडले, महाराष्ट्रावर फार उपकार…

Subscribe

Sanjay Raut first reaction | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंत्रीमंडाळांच्या अनेक शिफारशी नाकारण्यात आल्या, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay raut first reaction | मुंबई- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari Resignation) यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे राज्याच्या राज्यपाल पदाच्या गादीवर आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) बसणार आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतल्यापासून सातत्याने महाराष्ट्राविरोधी वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केला होता. अखेर राजीनामा मान्य होताच,”यामुळे
महाराष्ट्राच्या जनतेवर फार उपकार केले असं मी मानत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला भाजपाने शेवटपर्यंत पाठिशी घातलं, याची इतिहासात नोंद राहील,” असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. त्यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा राष्ट्रपतींनी देशातील 12 राज्यांचे राज्यपाल बदलले, कोणाच्या खाद्यांवर कोणत्या राज्याचा भार?

- Advertisement -

भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा सुपूर्द केल्याची बातमी समोर आली होती. तसंच, ते दीर्घकाळापासून निवृत्तीची आस लावून बसले होते. अखेर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना पदमुक्त केले आहे. मात्र, असं असलं तरीही विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचे बाण मारले जात आहेत. जाता जाता भगतसिंह कोश्यारी यांनी शिवप्रेमींची माफीही मागितली नाही, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याने महाराष्ट्रावर फार उपकार झाले नाहीत. त्यांनी माफी मागितली नसल्याने इतिहासात याची नोंद राहील असं संजय राऊतांनी पुढे स्पष्ट केलं.

राज्यातील जनतेने, राजकीय पक्षाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटनांनी एक भूमिका घेऊन राज्यपालांविरोधात प्रथमच लोक रस्त्यांवर उतरले. राज्यपालांनी भाजपाचे एजंट म्हणून काम पाहिलं हे घटनाबाह्य आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंत्रीमंडाळांच्या अनेक शिफारशी नाकारण्यात आल्या. पण मी याबाबत राज्यपालांना दोष देत नसून ते गृहमंत्रालयाच्या दबावाखाली होते, त्यामुळे त्यांना दोष देणार नाही. व्यक्ती दबाबावाखाली काम करते तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो, असंही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर; रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

- Advertisment -