उद्धव ठाकरे ३ दिवसांत पुन्हा ॲक्टिव्ह होणार, तात्पुरत्या CM कार्यभारावर संजय राऊतांचे वक्तव्य

sanjay raut gave information uddhav thackeray attend public event after 3 days
उद्धव ठाकरे ३ दिवसांत पुन्हा ॲक्टिव्ह होणार, तात्पुरत्या CM कार्यभारावर संजय राऊतांचे वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते पुढील ३ दिवसांनी पुन्हा कामात सक्रिय होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांवर मानेच्या आणि कंबरेच्या दुखण्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया तब्बल १ तास चालली. राज्यातील मुख्यमंत्रीपदाची सुत्रे काही दिवसांसाठी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची चर्चा सुरु होती. मात्र यामध्ये तथ्य नसून मुख्यमंत्री स्वतःच जबाबदारीने काम करतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठीचा आणि मानेच्या स्नायूच्या दुखण्याचा त्रास होत होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती चांगली आहे. परंतु मेडिकल बुलेटीन काढल्यावर माहिती मिळेल. मुख्यमंत्री ३ दिवसानंतर पुन्हा कामात रुजु होतील आणि जनतेची सेवा करतील असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाशी लढ्यात आणि राज्यातील विकासकामांसाठी काम करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. मानेचे स्नायू आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास होत असताना मुख्यमंत्र्यांनी कामाला प्राधान्य दिले. यामुळे मान आणि पाठीचे दुखणे अधिकच बळावले. यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर डॉ. शेखर भोजराज यांनी शस्त्रक्रिया केली आहे. मणका आणि पाठीच्या दुखण्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती देण्यता आली आहे. एच.एन. रिलायन्स फाऊन्डेशन रुग्णालयात मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरु आहेत. पुढील २ ते ३ दिवस मुख्यमंत्री रुग्णालयातच विश्रांती घेण्याची शक्यता आहे.


हेही वाचा :  एकनाथ शिंदे पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ट्विट