घरमहाराष्ट्रशिवसेनेचा 'मौके पे चौका', राधाकृष्ण विखेंना संजय राऊतांची ऑफर

शिवसेनेचा ‘मौके पे चौका’, राधाकृष्ण विखेंना संजय राऊतांची ऑफर

Subscribe

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखेंना ऑफर दिली आहे.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती आणि आज या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेने राधाकृष्ण विखे पाटील यांना ‘तुम्ही शिवसेनेत येऊन युती मजबुत करा’, अशी ऑफर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेनेने मारला ‘मौके पे चौका’

डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला असून नगरमधून सुजय यांचे नाव दिल्लीत पाठवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत सुजय विखे यांची नगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षात येताना सुजय यांनी कोणतेही अट घातलेली नाही. मात्र सुजय हे एक चांगलं नेतृत्व होऊ शकते. आम्ही खासदार उमेदवार म्हणून दिल्लीत पाठवत आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘मौके पे चौका’ मारला आहे.

- Advertisement -

सुजय यांच्या हातात भाजपचा झेंडा

भाजपमधील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, बबनराव पाचपुते, सदाभाऊ खोत, राज पुरोहित यांच्यासह सुजय पाटील यांचे अनेक समर्थक उपस्थित होते. भाजप प्रवेशाबाबत सुजय यांनी मुख्यमंत्र्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. भाजपने आपल्याला कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी दिली, असा उच्चार यावेळी त्यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाचा झेंडा सुजय यांच्या हातात देऊन अधिकृत पक्षात घेतले.

माझ्या वडिलांची जागा बजावली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वडिलांची जागा बजावली आहे. माझ्या संकटाच्या काळात त्यांनी मला साथ दिली आहे. त्यामुळे नगरमध्ये भाजप वाढीचे काम करणार असल्याची ग्वाही यावेळी सुजय यांनी दिली आहे.

- Advertisement -

वाचा – अखेर सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश; काँग्रेसला भगदाड

वाचा – आधी घरातल्या चोराचा बंदोबस्त करा – संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -