घरठाणेसंजय राऊतांच्या जामिनानंतर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जल्लोष; पेढे वाटत साजरा केला आनंदोत्सव

संजय राऊतांच्या जामिनानंतर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जल्लोष; पेढे वाटत साजरा केला आनंदोत्सव

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर राऊतांचा तुरूंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाण्यात राऊतांना जामीन मिळाल्यानंतर एक च जल्लोष साजरा करण्यात येत आहे. ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पेढे वाटत आणि फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.

ठाण्यातील तीन हात नाका या परिसरात ठाकरे गटाकडून प्रचंड जल्लोष करण्यात आला. यावेळी जामीन मिळाल्याचा आनंद देखील ठाकरे गटाने व्यक्त केला. राऊतांचे कट्टर समर्थक तुषार रसाळ यांच्या माध्यमातून हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी रसाळ आणि राऊत समर्थकांनी पेढ्यांचं वाटप केलं.

- Advertisement -

राऊतांच्या समर्थकांच्या हातात काही पोस्टर्स सुद्धा होते. यावर शिवसेनेचा वाघ पुन्हा मैदानात असं लिहिण्यात आलं आहे. तर दुसरीकडे भांडुप येथील राऊतांच्या मैत्री निवासस्थानी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. राऊतांच्या निवासस्थानी एलईडी लावण्यात आलेली आहे. या एलईडीवर शिवसेना खासदार संजय राऊत साहेब यांचे हार्दिक स्वागत अशा प्रकारचा मजकूर लावण्यात आला आहे.

राऊतांना भेटण्यासाठी कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी होणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गेल्या 100 दिवसांपासून ते जेलमध्ये आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर याआधी देखील सुनावणी झाली. पण त्यांना दिलासा मिळाला नव्हता. अखेर आज त्यांना विशेष पीएमएलए कोर्टाने दिलासा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : …हा त्यांच्या लेखणीचा विजय, राऊतांना जामीन मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -