Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'काय झाडी, काय हिरवळ... वाट पाहतोय तुमची झिरवळ'; संजय राऊत यांचे खोचक...

‘काय झाडी, काय हिरवळ… वाट पाहतोय तुमची झिरवळ’; संजय राऊत यांचे खोचक Tweet

Subscribe

निकालाच्या काही तास आधीच ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून अपात्र आमदार म्हणून नावे असणाऱ्यांवर निशाणी साधला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. आज सकाळी 10.30 नंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांचे घटनापीठ निकाल वाचन सुरु करेल. काल आजच्या कामकाजाचा बोर्ड सर्वोच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता.

हेही वाचा – सत्तासंघर्षाचे काउंटडाऊन : सर्वोच्च निर्णयाला उरले काही तास; पाहा कोण काय म्हणाले

- Advertisement -

दिल्लीतील एका प्रकरणाचा निकाल घटनापीठ आधी देणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल घटनापीठाकडून देण्यात येणार आहे. पण त्याआधी राजकीय नेत्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी म्हणजेच ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी निकाल आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पण निकालाच्या काही तास आधीच ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून अपात्र आमदार म्हणून नावे असणाऱ्यांवर निशाणी साधला आहे. (Sanjay Raut harsh criticism through Tweet)

“काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र! 😄😄 ” अशा आशयाचे ट्वीट करत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या प्रतोदकडून व्हीप बजावण्यात आला होता. त्यानंतर त्यावेळी विधानसभा अध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ यांनी या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. ज्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह असलेले इतर 50 आमदार हे गुवाहाटीत ठाण मांडून बसले होते. त्यावेळी त्यांच्यातील एक आमदार असलेले शाहाजी बापू पाटील यांनी हे “काय झाडी.. काय डोंगार…एकदम ओके हाय…” असे आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना विधान केले होते. त्याच वाक्याचा वापर करत संजय राऊत यांनी हा टोला लगावला आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे काही आमदारांसह अचानक थेट गुजरातला निघून गेले. ते का निघून गेले. त्याचे कारण काय, याची चर्चा सुरु झाली. अखेर भाजपच्या मदतीने शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याचे स्पष्ट झाले. तेथून शिवसेना फुटीचा प्रवास सुरु झाला. शिवसेनेचा एक एक आमदार शिंदे यांच्या गटात सामील होत होता. त्याचवेळी महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीचा व्हीप जारी करण्यात आला. या बैठकीला एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले 16 बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची नोटीस जारी करण्यात आली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही नोटीस जारी केली. त्याचदरम्यान 16 बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस जारी केली.

या दोन्ही नोटीसचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. त्यावर सुनावणी सुरु असतानाच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. तेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले. याच गोंधळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले.

- Advertisment -