घरमहाराष्ट्रअगतिक लोक म्हणजे चालते-फिरते मुडदे, संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल

अगतिक लोक म्हणजे चालते-फिरते मुडदे, संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल

Subscribe

संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पून्हा एकदा बंड खोर शिंदे गटावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यानी पुन्हा एकदा चालत्या फिरत्या मुडद्याची भाषा असा उल्लेख केला आहे.

काय आहे ट्विट –

- Advertisement -

या ट्विट मध्ये अगतिकता एक प्रकारे मृत्यूच आहे आणि अगतिक लोक चालते- फिरते मुडदे आहेत, असे म्हटले आहे.

- Advertisement -

या आधिही जीवंत मुडदे असा उल्लेख –

जे लोक 40 वर्ष पक्षात राहतात आणि त्यानंतर पक्ष सोडतात, त्यांचा आत्मा मेलाय. मग काय उरतं? जिवंत मुडदे. हे शब्द राममनोहर लोहिया यांचे आहेत. जिंदा कौमें पाँच साल इंतजार नहीं करती, हेदेखील राममनोहर लोहिया यांचं महत्त्वाचं वक्तव्य. हे शब्द नवे नाहीत महाराष्ट्र आणि देशासाठी. पण समजून घ्या तुमची बुद्धी आहे, ती कुंठित झाली आहे. तुमचा संपर्क तुटलाय समजाशी, लोकांशी, महाराष्ट्राशी त्यामुळेच तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करताय. मी कोणाचाच आत्मा आणि भावनांना ठेच पोहोचवली नाही. मी फक्त सत्य बोललोय. तुमचा आत्मा मेलाय म्हणून तुम्ही जिवंत मुडदे बनलायत.

मुख्यमंत्रीपद मिळणार असेलतर –

आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -