Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत नाशकात; काय भूमिका घेणार?

गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत नाशकात; काय भूमिका घेणार?

Subscribe

नाशिक : राज्य सरकारविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार संजय राऊत मंगळवारी (दि.१६) नाशिक दौर्‍यावर येत आहे. ते मंगळवारी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबाब देणार आहेत. शिवाय, त्यांनी मंगळवारी ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवेसेनेचे (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी नाशिक दौर्‍यावर असताना शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे शुक्रवारी (दि.१२) माध्यमांशी संवाद साधला. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे. या सरकारने जे आदेश काढले ते सर्व बेकायदेशीर आहेत. प्रशासकीय अधिकारी व पोलिसांनी बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नयेत. हे सरकार तीन महिन्यांत जाईल. बेकायदा आदेश पाळाल तर तुम्ही अडचणीत याल. न्यायालयाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे, असेही ते म्हणाले होते. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड करत दिली आहे.

- Advertisement -

राऊत म्हणाले की, जरी माझ्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी मी कारवाईला सामोरे जाणार आहे. माझ्यावर दबाव टाकून मला शरण यायला भाग पाडणे, शिवसेना सोडायला लावणे, उद्धव ठाकरे यांना सोडायला लावणे, अशा प्रकारची दबावनिती सुरू आहे. मात्र या दबावनीतीला आम्ही बळी पडणार नाही. प्रत्येक कारवाईला सामोरे जाण्याची धमक आहे. त्यावेळी बोललो ते अधिकार्‍यांना भडकवण्याचा हेतू नव्हता.

असे आहे ट्विट

- Advertisement -

नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री, गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे ‘गठन’ बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळ्याच घटनाना विरोधी ठरवले आहे. १६ आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील, अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनाने पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील, असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

- Advertisment -