घरमहाराष्ट्रबंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई, संजय राऊतांचा इशारा

बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई, संजय राऊतांचा इशारा

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचा ठराव करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी या गटाच्या नावाचे पत्रं विधासभा अध्यक्षांना पाठवल्यास शिवसेना त्याविरोधात कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

6 वा ठराव महत्त्वाचा – 

- Advertisement -

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत 6 महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मीडियाला दिली. या ठरावापैकी सहाव्या क्रमांकाचा ठराव अत्यंत महत्त्वाचा असल्याचं राऊत यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव इतर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाही. हे नाव शिवसेनेचे आहे. शिवसेनेसोबत राहील. कोणत्याही बेईमान आणि गद्दार या नावाचा राजकारणात वापरू शकणार नाही. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

हिंदु्त्वाचं धोरण पुढे नेणार –

- Advertisement -

आज करण्यात आलेल्या पाचव्या ठरावानुसार शिवसेनाही ठाकरेंची आहे व राहील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाचे धोरण पुढे नेईल. त्या विचाराशी प्रतारणा झाली नाही अन् होणार नाही. मराठी अस्मितेचा विचार आहे. तोही पुढे नेला जाईल, असा ठरावही मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार –

ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली ते कोणत्याही पदावर असोत, त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरें यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्याची तरतूदही या ठरावात करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -