घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 5 सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 5 सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार

Subscribe

संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांना 8 दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा एकदा त्यांना ईडीनं न्यायालयात हजर केले असता, त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे

मुंबईः पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांमुळे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आता संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आता पुन्हा एकदा 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. इतर कैद्यांप्रमाणे राऊत यांनाही कैदी क्रमांक देण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. त्यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांना 8 दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा एकदा त्यांना ईडीनं न्यायालयात हजर केले असता, त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -


संजय राऊत यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना 10 बाय 10 ची स्वतंत्र बॅरेक मिळाली असून, त्यात स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृहही आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळाली आहे. त्यांना बेड आणि पंखाही मिळाला आहे आणि बॅरेकभोवती सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संजय राऊत तुरुंगातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी कारागृह प्रशासनाकडे वही आणि पेनाचीही मागणी केली होती, जी मंजूर झाली असून, आता ते दिवसभरात अनेकदा काहीतरी लिहीत असतात. एवढेच नाही तर त्यांनी अनेक पुस्तकांची मागणी केली होती, ती उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तुरुंगात संजय राऊत काही ना काही वाचत राहतात.

काही दिवसांपूर्वी काही खासदार आणि आमदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात गेले होते, मात्र त्यांना भेटू देण्यात आले नाही. कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे की, संजय राऊतांना फक्त त्यांच्या कुटुंबीयांनाच भेटता येईल. याशिवाय अन्य कोणाला राऊत यांना भेटायचे असेल तर त्यांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राऊत यांना कारागृहात घरगुती जेवण आणि औषधे दिली जातात.

- Advertisement -

हेही वाचाः मुंबई – पुणे एक्सप्रेस वे 8 लेनचा करा; अजित पवारांची सरकारकडे मागणी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -