‘ते’ ट्वीट डिलीट! पण उपाध्ये राऊतांना म्हणतात, ‘दुकान जनतेने कुणाचं बंद केलं हे दिसतंय’

'दुकान जनतेने कुणाचं बंद केल हे दिसतय की. त्यातून ही चिडचिड, शिव्या', अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. सोमवारी खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटरवॉर रंगला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संजय राऊत यांनी दिली होती. मात्र त्याचा संदर्भ केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जोडत राऊतांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे म्हटले.

‘दुकान जनतेने कुणाचं बंद केल हे दिसतय की. त्यातून ही चिडचिड, शिव्या’, अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. सोमवारी खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटरवॉर रंगला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संजय राऊत यांनी दिली होती. मात्र त्याचा संदर्भ केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जोडत राऊतांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे म्हटले. यासंदर्भात दोघांनी ट्वीट केले होते. परंतु, आता हे ट्वीट दोघांनी डिलीट केले आहे. मात्र, केशव उपाध्ये यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिल्याचे ट्वीट डिलीट केलेले नाही. त्यामुळे संजय राऊत आणि केशव उपाध्ये यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut Keshav Upadhye Twitter conflict)

केशव उपाध्येंचे प्रत्युत्तर

“राऊत साहेब खोट बोलण्याचा प्रश्नच नाही. आपण शब्द वापरला की नाही? आपण मुळात पत्रकार संपादक, त्यात खासदार आपल्याला राग व्यक्त करायला अशी भाषा वापरावी लागते यापेक्षा महाराष्ट्राच दुदैव काय? आणि दुकान जनतेने कुणाचं बंद केल हे दिसतय की. त्यातून ही चिडचिड, शिव्या”, अशा शब्दांत केशव उपाध्ये यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले.

नेमके प्रकरण काय?

खासदार संजय राऊत यांना आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे भांडूपमध्ये होते आणि त्यांनी आरोप केला की… असा एक प्रश्न पत्रकार विचारत असतानाच त्याला मध्येच थांबवत, “अरे सोड रे *** आहे तो”, असे संजय राऊत म्हणाले. नेमके याचवेळी दुसरा पत्रकार राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौराबाबत प्रश्न विचारत होता.

केशव उपाध्येंचे डिलीट केलेल ट्वीट

याच प्रश्न-उत्तरांच्या गोंधळावरून केशव उपाध्ये आणि संजय राऊत यांच्यात ट्विटरवॉर सुरू झाला आहे. संजय राऊत यांच्या उत्तरानंतर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाराष्ट्राच राजकारण कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल ही भाषा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचा अपमान आपण करत आहात. मतभेद असू शकतात पण ही भाषा? असा सवाल करत संजय राऊत यांच्याकडे माफीची मागणी केली.

संजय राऊतांचे डिलीट केलेले ट्वीट

केशव उपाध्ये यांच्या या ट्वीटवर संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “केशवराव हे फालतूचे धंदे बंद करा! रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण क्लिप दाखवा आणि कॉमेंट करा.. महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल”, असे संजय राऊत यांनी म्हटले.


हेही वाचा – …तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल; राऊतांचा केशव उपाध्येंना इशारा