Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रSanjay Raut : महायुतीकडून अपक्षांना पैशांची ऑफर याचा अर्थ... राऊतांचा दावा

Sanjay Raut : महायुतीकडून अपक्षांना पैशांची ऑफर याचा अर्थ… राऊतांचा दावा

Subscribe

महायुतीकडून सध्या अपक्षांना पैशांची ऑफर करण्यात येत आहे. तसेच पैशांच्या थैल्या अपक्षांपर्यंत पोहोचवल्या जात आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही ही निवडणूक जिंकत आहोत, असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीला किमान 160 जागा मिळणार, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. आमचा एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे देखील यावेळी ते म्हणाले आहेत. तसेच महायुतीकडून सध्या अपक्षांना पैशांची ऑफर करण्यात येत आहे. तसेच पैशांच्या थैल्या अपक्षांपर्यंत पोहोचवल्या जात आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही ही निवडणूक जिंकत आहोत, असा दावा देखील राऊतांनी यावेळी केला आहे. (Mahayuti’s offer of money to independents means we are winning.)

हेही वाचा : Bribery case : पंतप्रधान मोदी काय प्रायश्चित्त घेणार? अदानी प्रकरणावरून ठाकरे गटाचे शरसंधान

- Advertisement -

तसेच यावेळी त्यांनी महायुतीला चांगलेच धारेवर धरले आहे. काल (गुरुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांचा मतदानाचा टक्का वाढल्याचे सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा हा प्रभाव असू शकतो असे ते म्हणाले होते. त्यावर आता संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले तुम्ही लाडक्या बहिणींचे मतं विकत घेतली आहेत का?

हेही वाचा : Maharastra Politics : आमच्याकडे संख्याबळ असेल तर…, प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका 

- Advertisement -

एक्झिट पोलवर आमचा विश्वास नसल्याचे देखील यावेळी ते म्हणाले आहेत. ते म्हणाले लोकसभेला आम्हाला केवळ 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. निकालानंतर काय झालं? असा सवाल त्यांनी केला आहे. तर जर बहुमताचा आकडा महायुतीकडे आहे तर मग ते अपक्षांना लोणी का लावत आहेत, असेही ते म्हणाले आहेत. तसेच मोदींना 400 जागा मिळणार, मात्र त्यांना बहुमत देखील मिळाले नाही. लोकसभेला आम्हाला दहा पण जागा मिळणार नाही, असा दावा करण्यात आला. आम्ही 31 जागा खेचून आणल्या. त्यामुळे या सर्वेची ऐशी की तैशी असे म्हणत राऊतांनी टोला लगावला आहे. तसेच आम्ही महाविकास आघाडीतील सर्व जण एकत्र बसलो त्यानंतर महाराष्ट्राचा अंदाज घेतला. अनिल देसाई, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील यांच्यासह सर्व नेते मंडळी एकत्र आलो होतो. प्रत्येक जागाचे गणित मांडले. तेव्हा आम्ही 160 जागांवर सहज निवडून येऊ असे स्पष्ट झाल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

तसेच जयंत पाटील हे उत्तम वाहन चालक आहेत. त्यामुळे ते उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरेंनी देखील उत्तमरित्या राज्य चालवले असेही ते यावेळी म्हणाले आहेत.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -