घरमहाराष्ट्रपुणेसंजय राऊत मूर्ख आणि मविआची सभा कॉमेडी शो; संजय शिरसाटांचे टीकास्त्र

संजय राऊत मूर्ख आणि मविआची सभा कॉमेडी शो; संजय शिरसाटांचे टीकास्त्र

Subscribe

पुणे : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या राड्याला संजय राऊत यांनी राज्य सरकार पुरस्कृत दंगल असे म्हटल्याने शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहेत. संजय राऊत मूर्ख आहेत आणि महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमधील सभा डायलॉगबाजी करण्यासाठी घेतलेला कॉ़मेडी शो असल्याची टीका त्यांनी केली आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील दंगल पूर्वनियोजित होती, तर अर्ध्या तासात बॉम्ब कुठून आले, असा सवाल त्यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर शहरात अंतर्गत असंतोष आहे आणि अतिरेकी कारवाया वाढत चालल्या आहेत. त्यामुळे याचा कुठेतरी बंदोबस्त होणे गरजेचे आहे. या दंगलीप्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मविआची सभा होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कारस्थान, संजय राऊतांचा आरोप

टोमणे, डायलॉगबाजी आणि एकमेकांना डोळे मारतील
महाविकास आघाडीची २ एप्रिलला सभा होणार आहे. याच्या सभेवर बंदी घातली तर आरोप करतील की, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. पण यांना केवळ राजकारण करायचे आहे. यांच्या सभेत दोन-चार टोमणे आणि डायलॉगबाजी असते, असे संजय शिरसाट म्हणाले. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील नेते शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या हितांबाबत सभेत काहीही बोलणार नाहीत. ते फक्त एकमेकांना डोळे मारून कॉमेडी सभा करतील. एकप्रकारे महाविकास आघाडीची सभा म्हणजे केवळ कॉमेडी शो असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी शांततेत कारवाई केली
खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीप्रकरणी पोलिसांना यायला उशीर झाल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, राडा सुरू झाल्यानंतर पोलिसांना यायला उशीर झाला तर त्यांच्या गाड्या घटनास्थळी जळालेल्या अवस्थेत का होत्या. रमजान, रामनवमीनिमित्त पोलीस त्याठिकाणी हजर होते आणि त्यांनी शांततेने कारवाई पार पाडली. अनुचित प्रकार घडू नये, वातावरण चिघळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले असल्याचे शिरसाट म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -