पुणे : पुण्यात शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाकडून (Thackarey Group) मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मेळाव्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा उल्लेख करताना गुजरात दंगलीचा किस्सा सांगितला. (Narendra Modi Gaya To Gujarat Gaya While mentioning Balasaheb Sanjay Raut told the story of Gujarat riots)
हेही वाचा – OBC Reservation : आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांनी दिली ओबीसी बांधवांना शपथ
संजय राऊत म्हणाले की, गुजरातमधील दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरुन काढायचं म्हणत होते. राजधर्माची आठवण करुन द्यायला अटलजी विसरले नव्हते. पण जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणार असल्याचे सांगितले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा | प्रमुख मार्गदर्शक – शिवसेना नेते, खासदार मा. श्री. संजय राऊत | पुणे – #LIVE https://t.co/8JBcdQDYsX
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) December 9, 2023
गुजरात दंगलीनंतर जेव्हा अख्ख जग टीका करत होतं, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून काढू नका असं सांगितलं होतं. अशी आठवण करून देतानाच संजय राऊत म्हणाले की, आता देश म्हणतो आहे की, नरेंद्र मोदी वापस आया तो पुरा देश गया. कारण मोदी जर पुन्हा 2024 मध्ये निवडून आले तर लोकशाही, स्वातंत्र्य सर्व काही जाईल, अशी भीती व्यक्त करत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा – OBC Reservation : आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांनी दिली ओबीसी बांधवांना शपथ
देवेंद्र फडणवीस यांना दिले थेट आव्हान
संजय राऊत म्हणाले की, ही शिवसेना उसळता सागर आहे. पुण्याच्या मैदाना ही शिवसेना कशी उतरते बघा, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला. तुम्ही आम्हाला शिल्लक सेना म्हणता, पण 2024 नंतर तुम्हीच शिल्लक राहणार का? हा विचार करा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यांनी असेही म्हटले की, या महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला शिल्लक सेना म्हणता, पण हीच सेना आम्ही पुन्हा सत्तेवर आणून दाखवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.