Sanjay Raut On Devendra Fadnavis मुंबई : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची जबाबदारी वाऱ्यावर टाकून नेहमीच सर्वत्र फिरत असतात. काही दिवसांपूर्वी दावोसला गेले होते. आता दिल्ली प्रचारासाठी गेले आहेत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. (Sanjay Raut On Devendra Fadnavis BJP Delhi Assembly Election 2025 Sanjay Raut News In Marathi)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली. “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची जबाबदारी वाऱ्यावर टाकून नेहमीच सर्वत्र फिरत असतात. काही दिवसांपूर्वी दावोसला गेले होते. आता दिल्ली प्रचारासाठी गेले आहेत. त्यानंतर आणखी कुठे जातील. पण महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या शिरावर पडली आहे. हे फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे”, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.
‘महाराष्ट्राचा फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताच भाजप दिल्लीत जिंकेल’
याशिवाय, “पण आता ते स्टार प्रचारक आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकलेल्या आहेत, त्याचे श्रेय फडणवीसांना मिळतं आहे. महाराष्ट्राचा फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर, प्रचार न करताही भाजप दिल्लीत जिंकेल. फडणवीसांना जायची गरज नाही. कारण महाराष्ट्राच्या विजयाचं पॅकेज भाजपनं दिल्लीत वापरायचं ठरवलं असेल तर, प्रचार कशासाठी पाहिजे. पण दिल्ली हे लहान राज्य आहे. त्यामुळे कदाचित दयाबुद्धीने ते विचार करू शकतात”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
मुलुंडचा पोपटलाल म्हणत संजय राऊतांची भाजप नेते किरीट सोमय्यांवर टीका
“कुंभ मेळ्यासाठी 10 हजार कोटींपेक्षा जास्तीचे बजेट देण्यात आले आहे. पण हे 10 हजार कोटी प्रत्यक्ष दिसत नाही. कोरोना काळातील महाराष्ट्रातील व्यवस्थेवर, खिचडी वाटपावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण कुंभ मेळ्यामध्ये 10 हजार कोटींपेक्षा जास्त दिलेले पैसे कुठे खर्च झाले? पैसे नक्की कुठे गेले? जर योग्य ठिकाणी पैसे खर्च केले असतील तर आज ही घटना का घडली. याप्रकरणी सदोष मनुष्य वदाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे? यासाठी मुलुंडच्या पोपटलाल ने तिथे गेले पाहिजे. तसेच, प्रयागराज येथे जाऊन त्या पोपटलालने प्रश्न विचारला पाहिजे 10 हजार कोटी कुठे गेले, कोणत्या गंगेच्या प्रवाहात वाहून गेले, लोकं का मेली, हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, याचं आम्हाला उत्तर द्या” असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा साधला.
हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या लक्ष ठेवण्याने 10 जणांचे प्राण परत येणार का? संजय राऊतांचा सवाल