घरताज्या घडामोडीमहाराजांवर लिखाणासाठी पंडित नेहरू, मोरारजी देसाईंनीही माफी मागितली होती - संजय राऊत

महाराजांवर लिखाणासाठी पंडित नेहरू, मोरारजी देसाईंनीही माफी मागितली होती – संजय राऊत

Subscribe

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाई फेकण्याच्या घटनेचा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी समाचार घेतला. संमेलनाच्या प्रांगणामध्ये झालेल्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. पण त्याचवेळी महापुरूषांच्या बाबतीत बोलताना आणि लिहिताना आपण कितीही विद्वान असलो, हुशार असलो किंवा संशोधक असलो तरीही भान बाळगायला हवे. छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कोणत्याही प्रकारचे वेडवाकड हे महाराष्ट्रात खपवून घेतले जात नाही. भावनांचा उद्रेक झालेला असला तरीही कृत्याबद्दल निषेध करतो, असेही राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिखाण केल्याबद्दल पंडित नेहरूंना माफी मागावी होती. मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. जेम्स लेनच्या प्रकरणाने महाराष्ट्रात वादळ उठले होते, या गोष्टींचीही आठवण करून दिली होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणामध्ये अशा प्रकारचे कृत्य होणे याचाआम्ही निषेध करतो. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले असे अनेक युगपुरूष महाराष्ट्राने देशाला दिले. या युगपुरूषांशी अनेकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच अशा महापुरूषांबाबत लिखाण करताना भान बाळगण गरजेचे आहे. महामानवांबद्दल बोलताना सावधगिरी बाळगण गरजेचे आहे. लाखो कोट्यावधी लोकांच्या भावना या प्रमुख युगपुरूषांशी जोडल्या आहेत. खासकरून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याशी अनेकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिखाण केल्याबद्दल पंडित नेहरूंना माफी मागावी होती. मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. जेम्स लेनच्या प्रकरणाने महाराष्ट्रात वादळ उठले होते. त्यामुळे अशा युगपुरूषांबद्दल लिहिताना सुशिक्षित विचारवंतांनी या दोन विभूतींनी आपण कितीही विद्वान, हुशार असलो किंवा संशोधन तरीही काही गोष्टींच भान बाळगायला हवं. छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कोणत्याही प्रकारचे वेडवाकड हे महाराष्ट्रात खपवून घेतले जात नाही. भावनांचा उद्रेक झालेला असला तरीही कृत्याबद्दल निषेध करतो.

- Advertisement -

रामनाथ कोविंद हे देशाचे राष्ट्रपती आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावर कार्यक्रम आयोजित केला आहे. देशाच्या प्रमुखाने रायगडावर जाऊन छत्रपतींना अभिवादन करणे, हे आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी संभाजीराजेंचे अभिनंदन केले.

नागालॅंडमध्ये झालेल्या नागरिकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेविरोधात सरकारने माफी मागितली आहे. कधी दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात, तर कधी आमच्यासारखांना देशद्रोही ठरवून तुरूंगात डांबले जाते. एवढेच की थेट गोळ्या घातल्या जात नाही. पण आमच्या मागेही सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. अशा पद्धतीने राज्य करण्याची प्रवृत्ती आणि विकृती वाढते आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेरांना फासले काळे

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -